अभिनेत्री विशाखा सुभेदार हिला कायमच तिच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाते. तिने ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. आता लवकरच विशाखा सुभेदार ही पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. विशाखा सुभेदार या लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ या मालिकेत झळकणार आहे. या पार्श्वभूमीवर विशाखा सुभेदारने एक पोस्ट शेअर केली आहेत.

विशाखा सुभेदारने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर तिने कॅप्शन दिले आहे. यात तिने या मालिकेत काम करताना तिला येणाऱ्या अडचणींबद्दल बोलून दाखवले आहे. त्याबरोबर मालिकेत काम करताना आणि विनोदी भूमिका साकारणे किती अवघड असते याबद्दलही तिने सांगितले आहे.
आणखी वाचा : वर्षभराच्या ब्रेकनंतर विशाखा सुभेदार करणार मालिकेत पुनरागमन, प्रोमो समोर

विशाखा सुभेदारची पोस्ट

“आत्ता..
आत्तू च्या भूमिकेत.
नवे रूप, नवे नाव “रागिणी”
मालिका जगतात पुन्हा एकदा..
नव्या सेटअप मध्ये काम करतेय.
प्रेम असू दया..!
अनेक वर्ष विनोदी काम करीत असल्याने प्रचंड स्पीडची सवय आत्ता मात्र खोडून काढतेय, नजरेतून व्यक्त व्हायचं, चेहेरा बोलका, हातवारे कमी, जेवढच तेवढंच, तोलमोल के बोल अशी वाक्य..!
स्वआत्मा अर्पण रागिणी ला.. आणि लेखक लिहितील ते, दिग्दर्शक सांगतील ते.. शिवाय त्यांची लगेचच मिळणारी पाठीवरची थाप, किंवा एक सूचना आणि “अजून एक टेक, चांगल होऊ शकेल “असं म्हणणं. सहकलाकारच्या डोळ्यात दिसणारी ओके टेकची गंमत,
सिरीयल मध्ये येणारे ट्वीस्ट (जे आत्ता सांगणार नाही )पण एकूण मज्जा येतेय..
पुन्हा एकदा दिवस रात्र एक पात्र डोक्यात वस्तीला असणं,
शूट सेट घर होऊन जाण. तिथली पात्र आपलं कुटुंब होऊन जाणं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे मी सध्या.
मायबापा.. आजवर जसं माझ्यावर प्रेम केलत तसें माझ्या ह्या कामावर, भूमिकेवर ही प्रेम करा. नक्की बघा.
स्टार प्रवाह वर.. 16 जानेवारी पासून,दुपारी 2 वा “शुभविवाह”, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : अक्षय केळकर ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पहिली पोस्ट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता शुभविवाह ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट यात दाखवली जाणार आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.