Mugdha - Prathamesh : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमात बालपणी दोघंही सहभागी झाले होते. यानंतर, पुढे काही वर्षांनी मुग्धा-प्रथमेश एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करू लागले. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्नगाठ बांधली. मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकले. मुग्धा-प्रथमेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दोघेही नेहमीच मराठी परंपरेनुसार सगळे सणवार साजरे करत असतात. सध्या श्रावण महिना चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात श्रावण महिन्याला प्रचंड महत्त्व आहे. श्रावणात प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं महत्त्व असतं. विशेषत: कोकणात श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. मुग्धा-प्रथमेश सुद्धा मूळचे कोकणवासी असल्याने त्यांच्या घरी सुद्धा नुकतीच श्रावणातील पूजा पार पडली. याचे खास फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले आहे. हेही वाचा : Video : “त्याला गेम नाही, पण माणसं कळली,” सुरज चव्हाणला केर काढताना पाहून उत्कर्ष शिंदे म्हणाला, “शिक्षण नसूनही कधी…” मुग्धा - प्रथमेशचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक मुग्धा - प्रथमेशने ( Mugdha - Prathamesh ) पूजा करताना पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. मुग्धा लाल रंगाची साडी, तर प्रथमेश पितांबर नेसून पूजेला बसला होता. मुग्धाने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये संस्कृत श्लोक लिहित प्रार्थना केली आहे. मुग्धा - प्रथमेशचा हा पारंपरिक अंदाज पाहून नेटकऱ्यांनी या जोडप्याचं कौतुक केलं आहे. "अगदी लक्ष्मी - नारायणाचा जोडा", "मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी संस्कृती जपणारी…सर्वांना आपले करणारी जोडी", "दोघं गोड दिसताय…तुमच्या साधेपणात खूप सौंदर्य आहे", "तुम्ही दोघंही गोड आहात" अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी मुग्धा - प्रथमेशच्या फोटोंवर केल्या आहेत. हेही वाचा : आजी अन् नातीचं प्रेम! सोनी राजदानसह फिरायला निघाली राहा कपूर; पापाराझी जवळ येताच केलं असं काही…; पाहा व्हिडीओ हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयात दाखवला जाणार ‘लापता लेडीज’, आमिर खान-किरण रावही असतील हजर; सरन्यायाधीशांनी सांगितलं स्क्रीनिंगचं कारण मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक ( Mugdha - Prathamesh ) दरम्यान, मुग्धा - प्रथमेशचा लग्नानंतरचा हा पहिलाच श्रावण आहे. ही श्रावणातली पूजा दोघांनीही आरवली येथे केली आहे. याठिकाणी प्रथमेशचं घर आहे. तर, मुग्धा- प्रथमेश पुण्यात राहतात. आपल्या कामातून वेळात वेळ काढून हे दोघंही ( Mugdha - Prathamesh ) गावी जाऊन - येऊन असतात. दोघेही आपल्या सुमधूर आवाजाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात.