Ram Kapoor Talks About Famous Bollywood Actress : ‘बडे अच्छे लगते है’, ‘कसम से’, ‘घर एक मंदिर’, ‘बसेरा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करीत अभिनेते राम कपूर यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. राम कपूर खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आले ते ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेमुळे. त्यामधील त्यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. काही दिवसांपासून राम कपूर चर्चेत आहेत. अशातच आता नुकतंच त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहेत.
राम कपूर यांनी मागे एका मुलाखतीमध्ये एकता कपूरबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकता कपूरनंही सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यांना प्रत्युतर दिलं होतं. अशातच आता राम कपूर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री व त्यांची सहकलाकार साक्षी तन्वरबद्दलही वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधताना त्यांनी टेलिव्हिजनवरील कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यामध्ये त्यांनी, “टेलिव्हिजनवरील कलाकारांनी जर मिळालेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, तर त्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्यांना ती उपयोगी ठरेल” असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी अभिनेत्री साक्षी तन्वर आणि अभिनेते रेनित रॉय यांचा उल्लेख केला आहे. रोनित रॉय आणि साक्षी तन्वर हे हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार आहेत. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या कलाकृतींमध्ये काम केलं आहे आणि त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.
राम कपूर साक्षी तन्वरबद्दल म्हणाले, “साक्षी खूप समजूतदार मुलगी आहे. तिला माझ्यासारखी महागड्या गाड्यांची आवड नाहीये. ती पैशांचा खूप जपून वापर करते. तिच्याकडे तिच्या सहा पिढ्यांना पुरेल इतका पैसा आहे. टेलिव्हिजनमधून खूप पैसा मिळतो. आपल्याला त्याचा फक्त योग्य वापर करता यायला हवा”.
राम कपूर व साक्षी तन्वर यांनी ‘बडे अच्छे लगते हैं’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. या मालिकेतील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल होता. तर अभिनेते रोनित रॉय यांनीदेखील आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. हे तिघेही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरे आहेत.