‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व पहिल्या दिवासापासूनच चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात मराठमोळा शिव ठाकरेही सहभागी झाला आहे. शिव याआधाही ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. ‘बिग बॉस हिंदी’च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी शिव एक आहे.

शिव ठाकरे ‘एमटीव्ही’ वरील ‘रोडीज’ या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाला होता. या शोमध्ये रणविजय सिंह, नेहा धुपिया व करण कुंद्रा परीक्षक होते. रणविजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिव ठाकरेच्या ऑडिशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिव “तुम्ही जे सांगाल ते करेन. तुमची मान कधीच खाली जाऊ देणार नाही. मराठी माणसाचं वचन आहे” असं म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा>> ‘दृश्यम २’च्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या तयारीत, म्हणाला “कथा तयार आहे पण…”

हेही पाहा>> Photos: टेरेस, स्विमिंगपूल अन्…; अलिबागमधील गावात विराट कोहली बांधणार १३ कोटींचं घर, पाहा फोटो

शिवचे ते शब्द ऐकून रणविजयचे डोळे पाणावले. रणविजय भावूक झालेला व्हिडीओमध्येही स्पष्ट दिसत आहे. रणविजयने शेअर केलेला शिवचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा>> ‘बिग बॉस मराठी’मध्ये मोठा ट्विस्ट, पहिल्यादांच होणार चार वाइल्ड कार्ड एन्ट्री, ‘ते’ स्पर्धक कोण असणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिव ठाकरे ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील चेहरा आहे. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अनेकदा शिव बिग बॉसच्या घरात टास्कदरम्यानही आक्रमक होताना दिसतो. मराठीप्रमाणेच तो हिंदी बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाची ट्रॉफी घरी घेऊन जाणार का, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.