Reshma Shinde New Business : अभिनय क्षेत्र सांभाळून अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत आपल्या वैयक्तिक आयुष्यात नवनवीन व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळालं. महेश मांजरेकर, अनघा अतुल, हार्दिक जोशी, सई ताम्हणकर, प्रसाद लिमये, अक्षया देवधर यांसारख्या अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत हॉटेल, कपड्यांचे व्यवसाय सुरू केल्याचं आपण पाहिलं. या यादीत आता छोट्या पडद्याच्या लाडक्या सूनबाईचं नाव सामील झालं आहे.

‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकेत रेश्मा आदर्श सूनेची भूमिका साकारत आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने रेश्मा नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता सध्या ती आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. ती गोष्ट म्हणजे रेश्माने आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. छोट्या पडद्यावरची लाडकी सून आता उद्योजिका झाली आहे. यासंदर्भात रेश्माने स्वत: पोस्ट शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे. याशिवाय तिने आपल्या नव्या व्यवसायाची झलक देखील सर्वांना दाखवली आहे.

हेही वाचा : Video : मालक अन् सांगकाम्या! Bigg Boss ने टास्क जाहीर करताच निक्कीने थेट जोडले हात; तर जान्हवीने…; पाहा व्हिडीओ

रेश्माने पालमोनास या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करत पुण्यात कोथरुड येते स्वत:चं ज्वेलरी शॉप उघडलं आहे. याबाबत पोस्ट शेअर करून तिने माहिती दिली आहे. रेश्माने ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगला पांढर्‍या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घालून वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळालं.

Reshma Shinde New Business
Reshma Shinde New Business : रेश्मा शिंदेचा नवीन व्यवसाय

रेश्मा शिंदेची खास पोस्ट

अभिनेत्री ( Reshma Shinde ) लिहिते, “अभिनयाच्या प्रवासात तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलंत. आता एक नवीन प्रवास तुमच्या साक्षीने सुरू करते आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठिशी असू दे. उद्योजिका म्हणून नवीन प्रवास सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी पालमोनास या ब्रँडबरोबर पार्टनरशिप करून हा व्यवसाय सुरू केला आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार”

हेही वाचा : नात करिश्मा जन्मल्यावर तिला पाहायला जाण्यासाठी राज कपूर यांनी दिला होता नकार, ठेवली होती ‘ही’ अट

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रेश्माच्या ( Reshma Shinde ) पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. श्रेया बुगडे, शिवानी बावकर, अभिज्ञा भावे, अनघा अतुल, ऋजुता देशमुख, अपूर्वा नेमळेकर, शिवानी सोनार, अश्विनी कासार यांनी पोस्टवर कमेंट्स करत अभिनेत्रीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.