scorecardresearch

“आमचं पहिलं बाळ…” शर्मिष्ठा राऊतने सुरु केली नवी इनिंग, पोस्ट चर्चेत

तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील तिच्या अनेक कलाकार मित्रमंडळीही कमेंट्स करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

sharmishtha raut

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर आता ती नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने तिच्या नव्या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.

आतापर्यंत अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली शर्मिष्ठा आता निर्माती म्हणून काम करणार आहे. ‘एरिकॉन टेलिफिल्म्स’ असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच ती एका मालिकेच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र ती मालिका कुठली असेल, त्यात कोणते कलाकार झळकतील हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. तिच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक होते. आता अखेर या मालिकेचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ असं या मालिकेचं नाव असून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषी शेलार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

आणखी वाचा : मोठी मुलगी पायलट तर आता अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचीही कौतुकास्पद कामगिरी, आनंद व्यक्त करत म्हणाल्या…

या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करत शर्मिष्ठाने लिहिलं, “आमचं पहिलं बाळ…” तुला शिकवीन चांगलाच धडा”… आत्तापर्यंत अभिनेत्री म्हणून प्रवास सुरुच आहे त्याच बरोबर निर्माती म्हणून नवीन प्रवास मी आणि तेजसने सुरु केला आणि त्यात मोलाची साथ आम्हाला दिली आमच्यावर विश्वास ठेवला झी मराठी आणि मधुगंधा कुलकर्णी ह्यांनी.. अभिनेत्री म्हणून, माणूस म्हणून तुम्ही रासिक प्रेक्षकांनी कायम मला साथ दिली…आता या पुढच्या नवीन प्रवासासाठी तुमचे आशिर्वाद कायम आमच्या सोबत असू दे…”

हेही वाचा : शर्मिष्ठा राऊतची नव्या इनिंगला सुरुवात, आनंदाची बातमी देत म्हणाली, “आता लवकरच…”

शर्मिष्ठाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील तिच्या अनेक कलाकार मित्रमंडळी देखील कमेंट्स करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ही मालिका १३ मार्चपासून झी मराठीवर सुरू होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 11:28 IST