मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेलं श्रद्धा वालकर हत्याकांड सध्या वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलंय. मुंबईतील श्रद्धा वालकरची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाने दिल्लीच्या महरौलीमध्ये हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. आता आफताबची नार्को चाचणी केली जाणार आहे. या केसवर पोलिस तपास सुरू असतानाच आता श्रद्धाचा मित्र आणि टीव्ही अभिनेता इमरान नजीर खानने आरोपी आफताबबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आफताबच्या ड्रग्जच्या व्यसनाबाबत श्रद्धाने आपल्याला माहिती दिली होती असं इमरानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलंय.

श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला दिल्ली येथे लिव्ह इनमध्ये राहत होते. पण लग्नाच्या मुद्द्यावरून भांडण झाल्यानंतर आफताबने श्रद्धाचा खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली. त्याकरता त्याने डेक्स्टर नावाची वेब सीरिज पाहिली होती असं पोलिसांकडे कबुल केलं आहे. याबाबत बोलताना इमरान म्हणाला, “श्रद्धाची हत्या झाली आहे याची मला जराही कल्पना नव्हती. जेव्हा हे हत्याकांड समोर आलं तेव्हा मी कश्मीरला माझ्या घरी गेलो होते. जेव्हा मुंबईमध्ये परतलो तेव्हा टीव्हीवर श्रद्धाच्या हत्येची बातमी पाहिल्यानंतर मला धक्काच बसला.”

आणखी वाचा- ‘वध’ ट्रेलर पाहून येईल श्रद्धा मर्डर केसची आठवण, नीना गुप्ता- संजय मिश्रांच्या अभिनयाची चर्चा

श्रद्धाबद्दल बोलताना इमरान म्हणाला, “जेव्हा मला श्रद्धाच्या निधनाबद्दल समजलं तेव्हा मी सत्य सांगण्यापासून स्वतःला थांबवू शकलो नाही. मी श्रद्धाला ओळखत होतो. ती माझी चांगली मैत्रीण होती आणि आम्ही फेब्रुवारी २०२१ मध्ये भेटलो होतो. त्यावेळी आपलं आयुष्य नरकासारखं झाल्याचं श्रद्धाने सांगितलं होतं. आफताब मागच्या २-३ वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचं तिने सांगितलं होतं. एवढंच नाही तर त्याचं व्यसन सोडवण्यासाठी तिने माझ्याकडे मदत मागितली होती.” दरम्यान इमरानने एका तरुणांना ड्रग्जचं व्यसन सोडवण्यासाठी मदत केलेली असल्याने श्रद्धाने त्याच्याकडे मदत मागितल्याचंही इमरानने सांगितलं.

आणखी वाचा- Shraddha Murder Case: त्यावेळी आफताब-श्रद्धानं एकत्र खरेदी केलेला गांजा? समोर आली धक्कादायक माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय इमरान पुढे म्हणाला, “आफताबचं ड्रग्जचं व्यसन सोडवण्यासाठी श्रद्धा खूप प्रयत्न करत होती. तिने त्याला अनेकदा समजावलं होतं. त्यांच्यात यावरून वादही झाले होते असं श्रद्धाने मला सांगितलं होतं. मी श्रद्धाला मदत करण्याचं कबुल केलं होतं. पण दिल्लीला गेल्यानंतर श्रद्धाने माझ्याशी कधीच संपर्क केला नाही.” इमरानच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने ‘हमारी बहू सिल्क’, ‘मॅडम सर’, ‘अलादीन’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. या व्यतिरिक्त त्याने बरेच दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.