‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही काळात नवनवीन मालिका दाखल होणार आहेत. सध्या रेश्मा शिंदेच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यावर लाडक्या दीपाला नव्या लूकमध्ये पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला होता. याशिवाय ही मालिका किती वाजता प्रदर्शित केली जाणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या एका नव्या प्रोमोमधून मालिकेची वेळ व प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेसाठी स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या सुरू असलेली कोणती तरी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार किंवा सध्याच्या मालिकेची वेळ बदलली जाणार हे निश्चित होतं. त्यानुसार आता ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला वाहिनीने संध्याकाळी ७.३० चा स्लॉट दिला आहे. या वेळेत सध्या ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका प्रसारित केली जाते. या मालिकेत सध्या सुरू असलेल्या सीक्वेन्सनुसार लवकरच ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती. अशातच आता नव्या मालिकेची वेळ जाहीर झाल्यावर अरुंधतीची गाजलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : “त्याची हालचाल थांबली अन्…”, श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यावर काय घडलं? पत्नीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की या मालिकेची वेळ बदलणार याबद्दल लवकरच अधिकृतपणे सांगितलं जाईल. दुसरीकडे, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत असून तिच्याबरोबर मुख्य अभिनेता कोण झळकणार ही माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा : निसर्गरम्य जागा, वेस्टर्न लूक अन्…; स्पृहा जोशीची नवऱ्यासह गोवा ट्रिप; शेअर केला खास व्हिडीओ

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये एका बालकलाकाराची झलक पाहायला मिळत आहे. ती बालकलाकार म्हणजे ‘मुलगी झाली हो’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ फेम आरोही सांबरे आहे. रेश्माच्या म्हणजेच जानकी रणदिवेंच्या लेकीची भूमिका आरोही साकारणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका १८ मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.