Tharla Tar Mag Fame Actor : मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच अनेक कलाकार त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडीही चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. या कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं एक अतूट नातं असतं.
कलाकारांच्या कामाविषयी आणि कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना कायमच रस असतो. त्यामुळे अनेक चाहते आवडत्या कलाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारत असतात, तर कलाकारसुद्धा या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतात.
छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका चाहत्यांच्या विशेष पसंतीची मालिका आहे. मालिकेतील सायली-अर्जुन या मुख्य कलाकारांबरोबर इतर सहाय्यक कलाकारही अनेकांचे आवडते आहेत. या मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. मालिकेतील कामाव्यतिरिक्त ते सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ द्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.
अशातच या मालिकेतील अभिनेता चैतन्य सरदेशपांडेची एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याला चाहत्यांनी काही प्रश्न विचारले आहेत आणि या प्रश्नांची चैतन्यने त्याच्या खास शैलीत उत्तरं दिली आहेत.
चैतन्य सरदेशपांडे इन्स्टाग्राम पोस्ट

एका चाहत्याने त्याला असा प्रश्न विचारला आहे की, “इंडस्ट्रीत मालिका किंवा चित्रपटात भूमिका मिळावी म्हणून कधी कॉम्प्रोमाइज केलं आहे का?” यावर चैतन्य उत्तर देत असं म्हणाला, “हो! मी माझ्या स्वप्नांच्या कुशीत झोपलो आहे. तर मी मेहनत आणि कधीकधी टॅलेंटबरोबरही कॉम्प्रोमाइज केलं आहे. कधीकधी अनेक नकारांशीसुद्धा मला कॉम्प्रोमाइज करावं लागलं आहे.”
यापुढे चैतन्य म्हणाला, “या इंडस्ट्रीत अनेक गोष्टी कथात्मक पद्धतीने सांगितल्या जातात. हे कोणतं स्कँडल नाही, ज्यामुळे तुम्हाला गॉसिप मिळू शकेल.” दरम्यान, चैतन्यची ही पोस्ट साध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या प्रश्नासह चैतन्यने आणखी काही प्रश्नांचीही उत्तरं दिली आहेत.