Aashu Shivas Unique Entry To Celebrate Vat Purnima: शिवा म्हटलं की प्रेक्षकांसमोर येते हटके स्टाइलने प्रेमात पाडणारी शिवा. स्टाइलसह ती धाडसी, जशास तसे उत्तर देणारी, अन्याय सहन न करणारी आणि घरच्यांसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या तिच्या स्वभावामुळे ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

‘शिवा’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आतापर्यंत शिवा अनेकदा गुंडांशी मारामारी करताना दिसली आहे. तिच्या मुलांसारख्या पोशाखामुळे तिला अनेकदा इतरांकडून ऐकूनही घ्यावे लागले आहे. मात्र, शिवाने कायमच तिचा स्वाभिमान व चांगुलपणा जपल्याचे पाहायला मिळाले. कीर्ती व दिव्या सतत कट कारस्थान करताना दिसल्या, पण या सगळ्यावर मात करत शिवाने तिची नाती, माणसं जपून ठेवली. सुरुवातीला शिवाविरुद्ध असणाऱ्या सिताईचे मन तिने जिंकले.

वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी आशू-शिवाची हटके एन्ट्री

आता ‘शिवा’ मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सर्व जण वटपौर्णिमेसाठी एकत्र जमले आहेत. या सगळ्यात शिवा मात्र तिथे नाही. दिव्या विचारते, “शिवा आली नाही?” कीर्ती म्हणते की येणारसुद्धा नाही. त्यावर आशूची बहीण म्हणते की तिचा पाय मुरगळला आहे. त्यावर दिव्या म्हणते की, आशूसाठी तर ती काहीही करू शकते, मग आता काय झालं? तितक्यात आशू व शिवाची एन्ट्री होते. दोघेही पारंपरिक वेशभूषेत तयार झालेले दिसत आहेत, ते दोघे गाडीवरून येतात.

शिवाला वडाभोवतीच्या प्रदक्षिणा पूर्ण करता याव्यात यासाठी आशू तिला गाडीवरून बसवतो व ती गाडी वडाभोवती फिरवतो. अशा हटके पद्धतीने शिवा तिची वटपौर्णिमा साजरी करताना दिसत आहे. ते पाहून सिताई शिवा स्टाइल शिट्टी वाजवते. तसेच ती दिव्याला हे ही ऐकवते की, याला म्हणतात आदर्श सून. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “यंदा वटपौर्णिमा तर साजरी होणार, पण शिवा स्टाईलने”, अशी कॅप्शन दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकतेच मालिकेत पाहायला मिळाले की, शिवाने पुन्हा शिक्षण सुरू करावे अशी संपूर्ण देसाई कुटुंबाची इच्छा आहे. तसेच, कीर्तीचा नवरा सुहास झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कट कारस्थान करत आहे. तो आता शिवा तसेच देसाई कुटुंबाविरुद्ध काय करणार, दिव्या, कीर्ती व सुहास शिवाविरुद्ध एकत्र येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.