‘झी मराठी’ वाहिनीवर १२ फेब्रुवारीपासून दोन नव्या मालिका सुरू होणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. वाहिनीने जाहीर केल्याप्रमाणे ‘पारू’ मालिकेचं प्रक्षेपण संध्याकाळी साडेसात वाजता ( १२ फेब्रुवारी ) करण्यात आलं. यानंतर प्रेक्षक ‘झी मराठी’च्या दुसऱ्या मालिकेची म्हणजेच ‘शिवा’ची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु, ऐनवेळी तांत्रिक कारणामुळे मालिकेचं प्रक्षेपण रखडलं आणि वाहिनीकडून जवळपास १० ते १५ मिनिटं जुने प्रोमो दाखवण्यात आले.

अभिनेत्री पूर्वा फडके आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘शिवा’ मालिका १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. परंतु, अखेरच्या क्षणी तांत्रिक कारणांमुळे ‘शिवा’च्या पहिल्या भागाऐवजी मालिकेचे आधीचे प्रोमोज दाखवण्यात आले. सर्वत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून ऐनवेळी प्रक्षेपण खोळंबल्यामुळे प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

हेही वाचा : ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये झळकणार ‘ही’ बालकलाकार! याआधी स्टार प्रवाहच्या तब्बल तीन मालिकांमध्ये केलंय काम

‘शिवा’ मालिकेचा पहिला भाग रखडल्यामुळे प्रेक्षकांनी दोन्ही मुख्य कलाकारांनी शेअर केलेल्या प्रोमोवर कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. पहिला भाग केव्हा प्रक्षेपित होणार? एवढी मोठी चूक कशी काय झाली अशी विचारणा नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

zee marathi
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

वाहिनीने शेअर केलेल्या मालिकेच्या प्रोमोवर “पहिल्या दिवशी एवढी मोठी चूक… शिवा मालिका सुरुच झाली नाही”, “पुन्हा एकदा पारू मालिका सुरू झाली”, “झेपत नसेल तर कशाला एकाच वेळी दोन मालिका सुरू करायच्या आणि तमाशा करायचा?”, “वाट पाहत होतो शिवा मालिकेची प्रकट झाली पारू”, “१५ मिनिटं जाहिरात दाखवली काय सुरू आहे तुमचं?” अशा असंख्य कमेंट्स करून घडल्या प्रकाराबाबत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

zee
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

हेही वाचा : ‘ही अनोखी गाठ’ : श्रेयस तळपदेचं दमदार कमबॅक! शरद पोंक्षेसह ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्याने वेधलं लक्ष, ट्रेलर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
shiva
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, ‘शिवा’ मालिकेचं प्रक्षेपण ऐनवेळी का रखडलं याबाबत अद्याप कलाकार आणि वाहिनीकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. आजपासून ( १३ फेब्रुवारी २०२४ ) रात्री ९ वाजता ही मालिका प्रसारित करण्यात येईल अशा चर्चा सध्या चालू आहे. मालिकेत पूर्वा, शाल्व यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर व अन्य बरेच तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत.