‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन पर्वासाठी चाहात्यांन सोबतच टिव्ही कलाकार देखील आतुर

नवीन जोशात नवीन सुरवात, कपिल शर्मने शेअर केलेली ‘ही’ पोस्ट सोशल मीडियावर झाली तुफान व्हायरल.

kapil-sharma- show-launch-date
photo-kapil sharma instagram

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’च्या फॅन्ससाठी आहे आनंदाची बातमी. आता त्यांना जास्त वाट बघावी लागणार नाही, करण त्यांचा आवडता शो ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे. कपिल शर्मा त्याच्या लोकप्रिय आणि बहुचर्चित शो मध्ये नवीन रूपात दिसणार असून सध्या त्याने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘द कपिल शर्मा शो’चा होस्ट कपिल शर्मा सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. तो आपल्या आगामी कामाबद्दलची माहिती नेटकऱ्यांना देत असतो. तसंच बऱ्याच महिन्यापासून या शोच्या परतीची चर्चा रंगताना दिसत होती. मात्र आता चक्क ‘द कपिल शर्मा शो’चा सूत्रसंचालक कपिल शर्मानेच या शोच्या सहकलाकारांसोबत फोटो शेअर केला आहे. कपिल शर्माने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोवरून हे स्पष्ट होत आहे की लवकरच हा शो आपल्या भेटीस येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने “जुन्या लोकांसोबत नवीन सुरवात”#blessing, #thekapilsharmashow, #comingsoon असे हॅशटॅग देखील दिले आहेत. कपिलने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, चंदन प्रभाकर, भारती सिंह आणि कीकू शारदा असे सह कलाकार दिसत आहेत. या फोटो मध्ये सर्व पुरुषांनी काळ्या रंगाचा सुट तर भारतीने सुंदरसा गाउन परिधान केल्याचे दिसून येत आहे.कपिलने शेअर केलेल्या या पोस्टवर लाखों लाइक्स मिळाल्या असून टिव्ही क्षेत्रातील बऱ्याच लोकानी कपिलच्या या पोस्टवर कमेंट देखील केल्या आहेत.

kapil-sharma- show-comment
photo-Kapil Sharma Instagram

 

दरम्यान इंडियन एक्सप्रेसला एका स्त्रोताने दिलेल्या वृत्तानुसार, सांगितले जात आहे की या शोचा सेट तयार होत असून आत्ता फक्त प्रोमो शूट झाले आहे. या प्रोमो मध्ये सगळे सुदेश लहरीचं स्वागत करताना दिसतील आणि हा शो पुढील महिन्याच्या अखेरी हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येईल. तसच ‘द कपिल शर्मा शो’ अॅगस्टच्या २१ तारखेला प्रक्षेपित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The kapil sharma show new begging with old face kapil shares photo on instagram with new cast members aad

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या