बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॉकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफ याची बहिण कृष्णा श्रॉफने स्वतःला फिल्म इंडस्ट्रीपासून दूरच ठेवलं आहे. मात्र तरीही तिचा स्टारडम कोणत्याही बॉलिवूडमधल्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. कृष्णा श्रॉफ ही फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे तिने तिच्या आयुष्यात कसे बदल केले याबद्दल ती नेहमीच विविध खुलासा करत असते. नुकंतच कृष्णाने एका मुलाखतीत तिच्या ब्रेकअपबद्दल काही खुलासे केले आहेत. यानंतर ती फिटनेसकडे नेमकी कशी वळली, तिने स्वत:ला कशाप्रकारे प्राधान्य दिले, याबद्दल सांगितले आहे.
कृष्णा श्रॉफने नुकतंच ईटी टाईम्सला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, “मी साडेपाच वर्षांपूर्वी फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. ती म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यांदा जिममध्ये पाऊल टाकले, त्यावेळी मी ब्रेकअपच्या काळातून जात होती. तो माझा पहिला ब्रेकअप होता. तो माझा पहिला प्रियकर होता. ते माझे पहिले नाते होते. पहिला अनुभव हा नेहमीच उत्तम शिकण्याचा अनुभव देतो. त्यावेळी मी स्वतःला पूर्णपणे हरवले होते. त्यावेळी काळ माझ्यावर वर्चस्व गाजवू लागला होता,” असे कृष्णाने सांगितले.




“त्या काळात मला माझ्यासाठी वेळ काढता आला नाही. मात्र जेव्हा माझ्या आयुष्यातील तो काळ संपला तेव्हा मी ठरवलं की मला स्वतःसाठी काहीतरी करायचे आहे. आता माझ्यासाठी फिटनेस हे सर्व काही आहे. फिटनेस हा तुम्हाला फक्त शारीरिक नव्हे तर मानसिकरित्याही तंदुरुस्त ठेवतो. यामुळे मला सुरक्षितता आणि आत्मविश्वास मिळाला आहे. विशेष म्हणजे याआधी मला इतका विश्वास मोठं होतं असताना कधीही मिळाला नव्हता,” असेही ती म्हणाली.
दरम्यान यावेळी तिला टायगर श्रॉफबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी ती म्हणाली की, “तो त्याच्या फिटनेसशिवाय खाण्यावरही विशेष लक्ष देतो. आमचे संपूर्ण कुटुंबच फिटनेस फ्रीक आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना प्रेरणा देण्याचे काम करतो. मी माझ्या भावाकडे पाहत असते. आपण सगळे एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरुन एक निरोगी वातावरण निर्माण होईल,” असेही तिने सांगितले.