ईदच्या मुहूर्तावर भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चाहत्यांना चित्रपटरुपी ईदी देण्यासाठी सज्ज झाला आहे. दरवर्षी या ‘दबंग’ अभिनेत्याचा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतो आणि सलमानच्याच नावाच्या चर्चांना उधाण येतं. यंदाही हा अभिनेता ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पाहता ‘ट्युबलाइट’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आणखी एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमुळे ‘ट्युबलाइट’च्या चर्चा रंगतायेत खऱ्या पण त्या चर्चांचं कारण आहे अभिनेता सोहेल खान.
‘ट्युबलाइट’च्या या नव्या फोटोंमध्ये अभिनेता सोहेल खान एका सैनिकाच्या वेशात दिसतो. हातात बंदूक घेऊन युद्धभूमीवर लढणाऱ्या सोहेलचा हा फोटो पाहता चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज लावला जात आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि सोहेल ही जोडी सात वर्षांनंतर स्क्रीन शेअर करत आहे. या चित्रपटात सोहेल एका सैनिकाच्या भूमिकेत दिसत असून, भारत- पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी असणारं कथानक यामध्ये साकारण्यात आलं आहे.
Some adrenaline-pumping action sequences await all of you in the #TubelightTrailer! Read what @firstpost has to say: https://t.co/rVR7nOYmdB pic.twitter.com/jJPRQ2kl7R
— Tubelight (@TubelightKiEid) May 24, 2017
‘ट्युबलाइट’ सिनेमातील सलमान- माटिनची मस्ती पाहिली का?
चित्रपटाच्या कथानकाच्या अनुषंगाने ते अधिक वास्तवदर्शी बनवण्यासाठी दिग्दर्शक कबीर खानने बहुतांश चित्रीकरण लेह-लडाखमध्ये केलं आहे. कबीर खानने या चित्रपटासाठी पट्टीच्या कलाकारांची फौज उभी केली होती. चित्रपटातील अॅक्शन सीन्सचं दिग्दर्शन ग्लेन बॉझवेल यांनी केलं असून, ‘टायटॅनिक’, ‘द मॅट्रिक्स’ आणि ‘द हॉबिट सीरिज’ या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी ते ओळखले जातात.
सलमा खान आणि सलमान यांची निर्मिती असणाऱ्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामध्ये सलमान आणि सोहेल यांच्यासोबत चिनी अभिनेत्री झू झूसुद्धा झळकणार आहे. याशिवाय बालकलाकार माटिन रे तंगूसुद्धा ‘ट्युबलाइट’मधील मुख्य आकर्षणाचा विषय ठरत आहे.