अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला करोनाची लागण झाली आहे. उर्मिलाने स्वत: एक ट्टीट करत ही माहिती दिली आहे. उर्मिलाला कोव्हिडची काही लक्षणं दिसू लागल्याने तिने तातडीने करोना चाचणी केली. त्यानंतर तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरनाची लागण झाल्यानंतर उर्मिलाने स्वत:ला क्वारंटीन केलं आहे.

उर्मिलाने एक ट्वीट शेअर केलंय. यात ती म्हणाली, “मी कोव्हिडची टेस्ट केली होती जी पॉझिटिव्ह आलीय. माझी प्रकृती ठिक असून मी स्वत:ला होम क्वारंटीन केलंय. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने त्वरित करोना चाचणी करुन घ्यावी ही विनंती.” असं म्हणत उर्मिलाने दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येकाने काळजी घ्या असं आवाहन केलंय.

मी नशीबवान कारण माझी मुलं…”, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया


उर्मिलाच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. उर्मिला मातोंडकरआधी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री निशा रावलने तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील नुकतेच करोनामुक्त झाले आहेत.

आर्यन खानच्या सुटकेनंतर सुहानाची पहिली पोस्ट, खास फोटो शेअर करत अनन्या पांडेला दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्रात शनिवारी २ हजार १४८ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, १ हजार १३० नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, २६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.