Katrina Kaif Baby Bump Photo Viral : कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या बातम्या सध्या खूप चर्चेत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत असा दावा केला जात आहे. या जोडप्याने अद्याप गरोदरपणाच्या बातमीची पुष्टी केलेली नसली तरी, सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, कतरिना कैफचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे.
खरंतर, एनडीटीव्हीच्या एका सूत्राने कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या बातमीला दुजोरा दिला आणि त्याचदरम्यान, एका रेडिट वापरकर्त्याने अभिनेत्रीचा बेबी बंप दाखवतानाचा फोटो शेअर केला. कतरिना कैफ मरून रंगाच्या गाऊनमध्ये शूटसाठी पोज देताना दिसत आहे. मात्र, हा फोटो तिच्या मॅटरनिटी फोटोशूटचा आहे की एखाद्या जाहिरातीचा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कतरिना कैफच्या गरोदरपणाबद्दलच्या अटकळांना ३० जुलै रोजी सुरुवात झाली, जेव्हा मुंबईतील एका फेरी पोर्टवर कतरिना आणि विकीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. कतरिनाने सैल पांढरा शर्ट आणि बॅगी पॅन्ट घातली होती आणि तिच्या कॅज्युअल पोशाखामुळे आणि सावकाश चालण्यामुळे अनेक चाहत्यांना प्रश्न पडला की ती गर्भवती आहे का? पोस्टवर “ती गर्भवती आहे का?” आणि “ती नक्कीच गर्भवती आहे असे दिसते” अशा कमेंट्सचा पाऊस पडला आणि इंटरनेटवर चर्चा सुरू झाली.
याआधी, कतरिनाच्या नवीन वर्षाच्या पोस्टमध्ये तिने पोल्का-डॉट ड्रेस घातल्यानेही गरोदरपणाच्या अटकळांना उधाण आले होते. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिचा लूक बॉलीवूडच्या “पोल्का-डॉट प्रेग्नन्सी मिथक”शी जोडला आणि त्याची तुलना अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोणशी केली, ज्या त्यांच्या गरोदरपणात सेम प्रिंटमध्ये दिसल्या होत्या.
विकी शेवटचा या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटात दिसला होता. तो पुढे ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याही भूमिका आहेत. तसेच, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मेरी क्रिसमस’ चित्रपटात कतरिना शेवटची दिसली होती, त्यानंतर तिने कोणताही चित्रपट साइन केलेला नाही.