विकी कौशल हा बॉलीवूड मधील एक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांत काम केले आहे. ‘उरी’ मधली त्याच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली होती. विकी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटासाठी असो किंवा त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधीत असो तो सतत चर्चेत असतो. मात्र आता विकी वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. विकी हा एक अष्टपैलू अभिनेता आहे. मात्र अभिनयसोडून अजून एका टॅलेंटसाठी विकी कौशल सध्या चर्चेत आहे.
विकी सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो सतत पोस्ट करून आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहतो. सध्या विकीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पोस्ट मध्ये विकीचे नवीन टॅलेंट लोकांच्या समोर आले आहे.
View this post on Instagram
नुकतीच विकीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्या पोस्टला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विकी त्याच्या क्यूट स्माईलने घायाळ करतो आहेच पण त्याच बरोबर त्याच्या हातात एक लक्ष वेधून घेणारे पेंटिंग देखील आहे. हे पेंटिंग गणपतीचे आहे. विकीच्या पोस्टवरून हाच अंदाज लावला जात आहे की हे पेंटिंग त्यानेच काढले असावे. विकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केल्याचे दिसून येत आहे. तसेच या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान विकी कौशल त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. तो आणि अभिनेत्री कतरिना कैफ रिलेशनशीप मध्ये असल्याचे समोर आले. तसेच विकी करण जोहरचा आगामी चित्रपट ‘तख्त’ मध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.