अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सेलिब्रिटी कपल नेहमीच चर्चेत असतं. दोघंही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर या दोघांचे लाखोंच्या घरात चाहते आहेत. अनुष्का-विराट दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. पण स्वतःला ते आवर्जून वेळ देतात. विराटसह अनुष्कादेखील तिच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देताना दिसते. आता या दोघांचा जिममधील एकत्र वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ विराटने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

अनुष्का-विराटचा हा जिममधील व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या व्हिडीओला काही तासांमध्येच २० लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव देखील होत आहे. विराटने हा व्हि़डीओ शेअर करत म्हटलं आहे की, “पुन्हा मी माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत जिमकडे वळलो आहे.” खरं तर इतरांना हेवा वाटावा असंच या दोघांचं नातं आहे.

आणखी वाचा – नोरा फतेहीच्या प्रेमात होता टेरेंस? रिलेशनशिपच्या चर्चांबाबत कोरियोग्राफरने सोडलं मौन

लग्नानंतर अनुष्का तिच्या संसारामध्ये रमली. प्रेग्नेंसीचाही संपूर्ण काळ तिने एण्जॉय केलं. मुलीचा सांभाळ करत असताना तिने तिच्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. याउलट तिने कामामधून काही वेळासाठी ब्रेक घेत कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय कौतुकास्पदच होता. पण तिने या सगळ्यामध्ये स्वतःसाठीही वेळ दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – VIRAL VIDEO : सोहेल खानच्या चेहऱ्याची अशी अवस्था का झाली? बदलता लुक पाहून व्हाल हैराण

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनुष्का-विराटने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता दोघं सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. दोघांच्या व्हायरल होणाऱ्या पोस्टवरून ते दिसून येतं. आता या दोघांना वामिका नावाची गोंडस मुलगी आहे. लवकरच अनुष्का तिच्या कामाला सुरुवात देखील करणार आहे.