अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या रिलेशनशीपबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा रंगू लागल्या. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने सुद्धा त्या दोघांचं अफेअर असून एकमेकांना डेट करत असल्याचं देखील सांगितलं होतं. त्यानंतर आता विकी आणि कतरिनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विकी कतरिनाला पाहून लाजताना दिसून आला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका अवॉर्ड सेरेमनीचा आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे तिघे स्टेजवर दिसून येत आहेत. कतरिनाच्या ‘कमली-कमली’ या गाण्यावर विकी कौशल डान्स करताना दिसतोय. त्यानंतर विकी कतरिनाच्या समोर त्याच्या ‘उरी’ चित्रपटातला एक डायलॉग बोलताना दिसून आला. विकी कतरिनाला म्हणतो, “Hows the Josh”. यावर उत्तर देताना कतरिना जोरदार आवाजात म्हणते, “हाय सर”. हे ऐकून विकी कौशल लाजतो.
View this post on Instagram
सलमान खानच्या समोर केलं कतरिनाला प्रपोज
याच अवॉर्ड सेरेमनीचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये विकी कौशल सलमान खानच्या समोरच कतरिनाला लग्नाची मागणी घालताना दिसतोय. विकी कौशल कतरिनाला म्हणतो, “एखादा चांगला विकी कौशल पाहून लग्न का नाही करत ? यावर कतरिना लाजून हसताना दिसून येते. हे पाहून सलमान खान सुद्धा हसतो. नंतर विकी कौशल ‘मुझसे शादी करोगी?’ गाणं म्हणत कतरिनाला प्रपोज करतो. हे ऐकून सलमान खान बाजुला बसलेली बहिण अर्पिताच्या खांद्यावर डोकं टेकवून डोळे बंद करून झोपून घेतल्याचं सोंग आणतो आणि कतरिना जोरजोरात हसते.”
View this post on Instagram
एका माध्यमासोबत झूम चॅटवर बोलताना अभिनेता हर्षवर्धन कपूरने विकी कौशल आणि कतरिना कैफच्या अफेअरवर शिक्कामोर्तब केलंय. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत, असं देखील तो यावेळी म्हणाला.