News Flash

बागेबाहेरची धम्माल पाटी

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधीक छायाचित्र

एका बागेबाहेर लावण्यात आलेली पाटी (स्थळ अर्थातच पुणे)
– सर्वांनी तिकीट काढूनच आत येणे बंधनकारक आहे. चिंधीगिरी नको.
– तिकीट शुल्क चुकवण्यासाठी ‘नेहमीच येतो’, ‘भाऊंनी पाठवलंय’ वगैरे कारणे येथे चालणार नाहीत.
– कोणत्याही झाडाला विनाकारण आणि कारण काढूनही स्पर्श करू नये.
– झाडांच्या बुंध्यावर ‘लव्ह यू’ वगैरे फाजील मजकूर लिहिलेला खपवून घेतला जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या गोष्टी टिपल्या जात आहेत हे लक्षात घ्या.
– प्रिय व्यक्तीस ‘मी तुला खरंच आवडते/आवडतो का?,’ वगैरे लाडिक प्रश्न विचारताना गवत उपटण्याची गरज नाही. ते पुन्हा वाढायला वेळ लागतो.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 5:00 am

Web Title: marathi jokes on punekar
Next Stories
1 …अन् काकांनी टीसीला गंडवलं
2 मुंबईकराचा प्रश्न आणि पुणेकराचे उत्तर
3 पुणेरी घरमालक आणि धमकी
Just Now!
X