इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई महापालिका आणि म्हाडाला अधिक जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले. महापालिका आणि म्हाडा यासारख्या संस्थांनी अधिक जबाबदारीने आपले काम केले पाहिजे. घटना घडल्यानंतर केवळ एकमेकांकडे बोट दाखविण्यात काहीच अर्थ नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या पीठाने हा निकाल दिला. हरेकष्ण बिल्डर्सने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने महापालिका आणि म्हाडाला हे निर्देश दिले. मुंबईमधील एक ९० वर्षे जुनी पाडण्यासाठी न्यायालयाने म्हाडाला सूचना द्याव्यात, यासाठी हरेकृ्ष्ण बिल्डर्सने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने म्हाडा आणि मुंबई महापालिकेला अधिक जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.