News Flash

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; तिघांचा मृत्यू, पाच जखमी

दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून तो तळमजल्यावर आल्याचे प्राथमिक माहितीतून कळते.

उल्हासनगर येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण ठार झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कॅम्प ३ भागातील मेमसाब नामक इमारतीचा स्लॅब कोसळल्याचे सुत्रांकडून कळते. पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

उल्हासनगरमधील इंदिरा गांधी मार्केटमध्ये ही मेमसाब नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर साई आशिर्वाद नावाचे क्लिनिक आहे. या इमारतीचा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून तो क्लिनिकमध्ये पडला. यामध्ये ३ महिलांचा जागीत मृत्यू झाला यामध्ये एका चिमुकलीचा समावेश आहे. तर इतर तीन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना उल्हासनगरमधील सेंट्रल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नितू साजेदा (वय ६०), अनिता मौर्य (वय ३०), प्रिया मौर्य (वय ३) यांचा मृतात समावेश आहे. तर, हिराखेम चंदानी (वय ८०), वंदाना मौर्य (वय २४), खुशी मौर्य (वय २) हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 4:22 pm

Web Title: building slab collapses in ulhasnagar three dead five injured
Next Stories
1 फिटनेस पोलिसांचा ! मुंबई पोलिसांना ‘शेप’मध्ये आणण्यासाठी ऋजुता दिवेकरांचं ‘डाएट’
2 ‘पबजी’चा हट्ट, मुंबईत तरुणाची आत्महत्या
3 मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा कोर्टातून पोबारा
Just Now!
X