News Flash

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

विविध कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेतला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विविध कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आज मेगाब्लॉक घेतला आहे. माटुंगा ते मुलुंड डाऊन धिमा मार्ग, सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर व चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असेल. हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून मध्य रेल्वे मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या उशिराने धावतील.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे – माटुंगा ते मुलुंड डाऊन धिमा मार्ग

कधी-  स.११.२० ते दु.३.५० वा

परिणाम- माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. धिम्या मार्गावर विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकात लोकल थांबणार नाहीत.

पश्चिम रेल्वे

कुठे- चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दोन्ही जलद मार्गावर

कधी- स.१०.३५ ते दु.३.३५ वा

परिणाम- चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येत असल्याने त्या स्थानकादरम्यानची लोकल सेवा धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

हार्बर मार्ग

कुठे- सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर

कधी- अप मार्ग-स.११.१० ते दु.३.४०  आणि डाऊन मार्ग- स.११.४० ते दु.३.४० वा

परिणाम- सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 7:31 am

Web Title: mega blocks on this sunday the all three railway route
Next Stories
1 ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
2 विजेविना कॅमेरे कुचकामी
3 तलासरीमधील ग्रीनपार्क रिसॉर्टवर पोलिसांची धाड, ८ तरुणींसह ११ पुरुष ताब्यात
Just Now!
X