News Flash

मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘टी-सीरिज’ने मागितली जाहीर माफी

अमेय खोपकर यांच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजने युट्यूबवरुन हटवलं आतिफ अस्लमचं गाणं

संग्रहित छायाचित्र

मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘टी-सिरीज’ने जाहीर माफी मागितली आहे. पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याचं गाण युट्यूबला अपलोड केल्यानंतर अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून गाणं तात्काळ हटवण्याची मागणी करत टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांना इशारा दिला होता. “भूषण कुमार तू याला धमकी समज, पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तर तुला खूप महागात पडेल,” अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी इशारा दिला होता.

यानंतर टी-सीरिजने जाहीर माफी मागितली आहे. टी-सिरिजकडून माफी मागणारं पत्र पाठवण्यात आलेलं असून मनसेने ट्विटरवर शेअर केलं आहे. “हे गाणं आमच्या प्रमोशन टीमच्या एका कर्मचाऱ्याने टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केलं होतं. त्याला माहिती नसल्याने ही चूक झाली. याबद्दल आम्ही माफी मागतो आणि यापुढे हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज किंवा प्रमोट करणार नाही अशी खात्री देतो,” अशी हमी टी-सीरिजने दिली आहे. या पत्रात त्यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही बाबींमध्ये सहाय्य करणार नाही याची खात्रीही दिली आहे.

अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून भूषण कुमार यांना इशारा दिला होता. सोनू निगम यांनी केलेल्या आरोपानुसार माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही. केलेले आरोप खरे असतील तर मागे पुढे पाहणार नाही. आतिफ अस्लम हा पाकिस्तानी गायक आहे. त्यामुळे तात्काळ त्याचे गाणे टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनलवरून काढून टाका अशी मागणी त्यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 2:18 pm

Web Title: t series apology to mns over atif aslam song on youtube sgy 87
Next Stories
1 एशियाटिक सोसायटीतील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले
2 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मालिकांचे चित्रीकरण नाही
3 बालसुधारगृहातील ७५ मुलांची कोंडी
Just Now!
X