03 August 2020

News Flash

अंधेरीच्या रस्त्यावरुन भाईगिरी सुरु करणारा रवी पुजारी बनला अंडवर्ल्ड डॉन

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या गुन्हेगारीची सुरुवात मुंबईच्या रस्त्यावरुन झाली.

९० च्या दशकातील कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगल या देशामध्ये अटक झाली असून, त्याला भारतात आणण्याची प्रकिया सुरु आहे. त्यासाठी कर्नाटक पोलिसांची विशेष टीम आणि ‘रॉ’ चे पथक सेनेगलमध्ये तळ ठोकून आहे.

कोण आहे रवी पुजारी?
रवी पुजारी आता ५१ वर्षांचा असून, तो मूळचा कर्नाटकातील उडिपी जिल्ह्यातील मालपी या गावचा. त्याचे वडिल सुर्या पुजारी एका शिपिंग कंपनीमध्ये नोकरीला होते. त्याची आई आणि बहिण दिल्लीमध्ये राहतात. रवी पुजारीचा जन्म कर्नाटकमध्ये झाला असला तरी, तो लहानाचा मोठा मुंबईमध्ये झाला.

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या गुन्हेगारीची सुरुवात मुंबईच्या रस्त्यावरुन झाली. शाळा अर्धवट सोडणारा रवी पुजारी सुरुवातीला अंधेरीमध्ये छोटे-मोठे गुन्हे करायचा. पण बाळा झाल्टेची हत्या केल्यानंतर रवी पुजारी हे नाव मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात चर्चेत आले. छोटा राजनची नजर रवी पुजारीवर गेली व छोटा राजन गँगसाठी काम करु लागला. अल्पावधीत त्याने राजनचा विश्वास संपादन केला.

९० च्या दशकात रवी पुजारी दुबईला गेला व मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातीव बिल्डर्सकडून खंडणी वसुली सुरु केली. ९० च्याच दशकात त्याच्या तीन माणसांनी चेंबूरच्या ऑफीसमध्ये घुसून ओम प्रकाश कुकरेजा यांच्यावर गोळया झाडल्या. आठ वर्षांपूर्वी नवी मुंबईतील एका बिल्डरवर त्याने हल्ल्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने ते बचावले.

भारत सोडून पळाल्यानंतर रवी पुजारीने काही काळ ऑस्ट्रेलियन पासपोर्टवर ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्य केले. या दरम्यान त्याने हिंदू डॉन म्हणूनही स्वत:ला स्थापित करण्याचा प्रयत्न केला. १३ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूमधील वादावरुन रवी पुजारीने हुरियतचे नेते सय्यद अली शाह गीलानी यांना संपवण्याची धमकी दिली.

रवी पुजारीने नंतर बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनाही धमकावण्याचा प्रयत्न केला. २०१७-१८ मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याबद्दल तक्रारी दाखल केल्या. २०१९ मध्ये केरळचे आमदार पी.सी.जॉर्ज यांनी रवी पुजारीकडून धमक्या येत असल्याची पोलीस तक्रार केली. जॉर्ज यांना हे फोन कॉल सेनेगलमधून येत असल्याचे केरळ पोलिसांच्या तपासातून समोर आले.

२००९ ते २०१३ दरम्यान रवी पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या दिल्या. जानेवारी २०१९ मध्ये सेनेगलच्या दाकारमध्ये त्याला अटक झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 10:33 am

Web Title: who is under world don ravi pujari dmp 82
Next Stories
1 उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर
2 उद्धव ठाकरे यांची कसोटी
3 मुख्यमंत्र्यांची सोनियांकडे सहकार्याची अपेक्षा
Just Now!
X