समीर वानखेडे अडचणीत ; लाचखोरीच्या आरोपप्रकरणी चौकशीचे आदेश

आर्यन खान प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेला सोमवारी चौकशीला बोलवले होते, पण ती चौकशीला आली नाही.

‘एनसीबी’चे पथक आज मुंबईत?

मुंबई : आर्यन खान प्रकरणात ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या २५ कोटींच्या लाचखोरीच्या आरोपाबाबत त्यांची ‘एनसीबी’च्या दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तर ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंचाने केलेल्या लाचखोरीच्या आरोपांना बेदखल करण्याची वानखेडे आणि एनसीबी यांची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी एनसीबीकडून दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी एनसीबीचे पथक आज, मंगळवारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच मागण्यात आली होती, त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देणार होते, असा आरोप साईल यांनी केला आहे.

‘एनसीबी’च्या गुन्ह्य़ासंदर्भातील साक्षीदार प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र आपण पुढील कार्यवाहीसाठी एनसीबीच्या महासंचालकांना पाठवत असल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी रविवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर याप्रकरणी एनसीबीचे महासंचालकांनी हे प्रकरण दक्षता विभागाकडे वर्ग केले असून याप्रकरणी दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी सोमवारी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

दक्षता विभागाचे प्रमुख या प्रकरणात चौकशी करणार आहेत. त्यासाठी दक्षता पथक लवकरच मुंबईत येणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. या चौकशीचे पर्यवेक्षक सिंग असतील. या प्रकरणात एनसीबीकडून न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आले आहे. दरम्यान, आर्यन खान प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेला सोमवारी चौकशीला बोलवले होते, पण ती चौकशीला आली नाही.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साईल यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत ते बेदखल करण्याची वानखेडेंची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली. पंच साईल यांनी के लेले आरोप तपासात अडथळे निर्माण करण्याचा आणि तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करत त्याच्या प्रतिज्ञापची दखल घेऊ नये, अशी मागणी वानखेडे यांनी केली होती. ती फेटाळताना एनसीबीच्या मागणीच्या आधारे सरसकट आदेश देता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने प्रामुख्याने नमूद के ले.

या प्रकरणी अटके त असलेल्या आर्यन खान याची प्रकरणातून सुटका करण्यासाठी वानखेडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी २५ कोटी रुपयांची मागणी के ल्याचा आरोप साईल यांनी केला आहे. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही त्याने तयार केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एनसीबी आणि वानखेडे यांनी सोमवारी विशेष न्यायालयात स्वतंत्र अर्ज करत त्यांचे हे प्रतिज्ञापत्र ग्राह्य़ धरू नये, अशी मागणी के ली होती.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी मात्र एनसीबी आणि वानखेडे यांना या प्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने आपल्या आदेशात, एनसीबीने अर्जाद्वारे मागितलेला दिलासा पाहता त्यादृष्टीने सरसकट आदेश देता येणार नाही. किं बहुना अशा प्रकरणात संबंधित न्यायालय आवश्यक त्या टप्प्यावर योग्य तो आदेश देऊ शकते, असे स्पष्ट केले.

शिवाय आर्यनसह या प्रकरणातील अन्य काही आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका के ली असून ती प्रलंबित आहे. एकू णच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे एनसीबीच्या मागणीच्या अनुषंगाने हे न्यायालय कोणाताही आदेश देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.

दबावाचा प्रयत्न : एनसीबी

तपास यंत्रणा आणि तिच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप खोटे, दिशाभूल करणारे आहेत. त्याद्वारे तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा एनसीबीने विशेष न्यायालयात के लेल्या अर्जात के ला आहे. वानखेडे यांच्यासह तपास यंत्रणेच्या अन्य अधिकाऱ्यांची आतापर्यंतची सेवा निष्कलंक आहे. त्यांनी प्रामाणिकपणे आणि सचोटीने त्यांचे काम केले आहे. मुंबईला अमलीपदार्थमुक्त शहर बनवण्यासाठी हे अधिकारी अथक आणि अविरत काम करत आहेत. मात्र साईलसारख्या व्यक्ती या तपासात अडथळा निर्माण करण्याचा आणि तपास यंत्रणेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्य पुढे येऊ नये यासाठी तपास अधिकाऱ्यांवर हेतूत: अशा प्रकारचा दबाव टाकून त्यांचे मनोधैर्य कमी केले जात आहे. त्यामुळेच न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी एनसीबीने केली होती. 

जावयाला अटक केल्यानेच लक्ष्य!

वानखेडे यांनी विशेष न्यायालयात केलेल्या अर्जात साईल याने त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले. तसेच आपण या प्रकरणाचा निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे तपास करत असून तो काहींच्या हितसंबंधांना धक्का पोहोचवणारा आहे. त्यामुळेच आपल्याला अटकेच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा वानखेडे यांनी केला. नामांकित राजकीय नेत्याकडून आपल्याला व्यक्तिश: लक्ष्य केले जात आहे. एनसीबीने या नेत्याच्या जावयाला अटक केल्यानेच आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना लक्ष्य केले जात असल्याचा दावाही वानखेडे यांनी केला आहे. मात्र आपण निर्दोष असून ते सिद्ध करण्यासाठी कोणत्याही चौकशी व तपासाला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही यांनी अर्जात म्हटले होते, या प्रकरणातील आरोपी हे समाजातील उच्चभ्रू आणि प्रभावशाली कुटुंबातील असल्यानेही आपल्याला अटकेसारख्या कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावाही वानखेडे यांनी केला आहे.

दिवसभरात काय घडले?

– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी, ‘‘वानखेडे मुस्लीम असतानाही त्यांनी राखीव कोटय़ातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळवला’’, असा प्रश्न केला.

– दुसरीकडे वानखेडेंवर २५ कोटींच्या लाचखोरीचा आरोप करणारे पंच प्रभाकर साईल यांना मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले.

–  साईल यांनी केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी एनसीबीकडून दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मलिक-वानखेडे आरोप-प्रत्यारोप

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सोमवारी आणखी काही आरोप केले. वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सादर के ली. समीर यांचे आई-वडिल मुस्लीम होते मग त्यांनी राखीव कोटय़ातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी के ला. मात्र आपले वडील हिंदू तर आई मुस्लीम होती, असे प्रत्युत्तर वानखेडे यांनी दिले. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची छायाचित्रेही प्रसारित केली. त्यावर आपला २०१६ मध्ये घटस्फोट झाला आणि त्यानंतर अभिनेत्री क्रोंती रेडकर यांच्याबरोबर विवाह झाल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले.

खासगी जीवनावरील हल्ले दु:खद : वानखेडे

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक जन्मदाखला ट्वीटर हँडलवर प्रसारित करून तो समीर वानखेडे यांचा असल्याचा दावा केला आहे. त्यावर, वानखेडे यांनी, ‘‘माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदूू आणि माझी आई झहीदा मुस्लिम होती. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे’’, असे स्पष्ट केले आहे. २००६ साली विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केल्याचे स्पष्टीकरण वानखेडे यांनी दिले आहे. २०१६ मध्ये वानखेडे आणि शबाना यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर २०१७ मध्ये मी क्रांती रेडकरशी विवाह केला. माझी खासगी कागदपत्रे ट्वीटरवर प्रसारित करणे अपमानास्पद आहे. मलिक यांच्या कृत्यांमुळे मी आणि माझे कुटंबिय मानसिक, भावनिक तणावाखाली आहोत. माझ्या खासगी जीवनावरील हल्ले दु:खद आहेत, असे वानखेडे यांनी म्हटले आहे.

 ‘तक्रोर दाखल झाल्यास वानखेडेंवर कारवाई

वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत जुजबी चर्चा झाल्याचे राज्याचे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले. वानखेडेंवरील आरोपांबाबत चौकशीची मागणी नवाब मलिक यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेने के ल्याकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, आपली या संदर्भात अद्याप मलिक यांच्याशी चर्चा झालेली नाही, पण कोणी तक्रोर दाखल के ल्यास चौकशी के ली जाईल, असे वळसे यांनी स्पष्ट के ले.

आरोप बेदखल करण्याची मागणी फेटाळली

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साईल यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत ते बेदखल करण्याची वानखेडेंची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली. पंच साईल यांनी के लेले आरोप तपासात अडथळे निर्माण करण्याचा आणि तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करत त्याच्या प्रतिज्ञापची दखल घेऊ नये, अशी मागणी वानखेडे यांनी केली होती.

पंच साईल यांना पोलीस संरक्षण

वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा आरोप करणारे पंच प्रभाकर साईल यांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी के ली. साईल यांची पोलीस संरक्षणाची मागणी मान्य झाली. लाचखोरीचा आरोप करणाऱ्या साईल यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली.

दबावाचा प्रयत्न : एनसीबी तपास यंत्रणा आणि तिच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप खोटे, दिशाभूल करणारे आहेत. त्याद्वारे तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा एनसीबीने विशेष न्यायालयात के ला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan drugs case ncb orders probe against sameer wankhede over bribery charges zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या