scorecardresearch

“…भाऊ, म्हणून माझं तुमच्यावर लक्ष असतं”; एकनाथ खडसेंच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टीप्पणी

विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात झालेला संवाद सद्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

devendra fadnavis replied to eknath khadse,
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत राज्यापालांच्या अभिभाषणावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. राज्यपालांच्या अभिभाषणात शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचा उल्लेख नाही, असं ते म्हणाले होते. दरम्यान, खडसेंच्या या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टीप्पणी केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात झालेला संवाद सद्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

हेही वाचा – किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब आक्रमक; विधान परिषदेत मांडला थेट हक्कभंग प्रस्ताव; म्हणाले…

नेमकं काय घडलं?

एकनाथ खडसे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचा उल्लेख नाही, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. “खरं तर राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना एकनाथ खडसे सभागृहात उशीरा आले. त्यामुळे त्यांनी भाषण ऐकलंच नाही”, असे ते म्हणाले. त्यावर एकनाथ खडसे यांनी “तुमचं माझ्यावरच लक्ष असतं”, अशी प्रतिक्रिया दिली. खडसेंच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना आम्हाला “तुमच्यावर लक्ष ठेवावंच लागतं, त्यात आता तुम्ही गटनेते झाला आहात, त्यामुळे आता जास्त लक्ष ठेवावं लागेल”, असे ते म्हणाले. तसेच “गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी तुम्हाला त्रास देऊ नये म्हणून मी तुमच्यावर लक्ष ठेऊन असतो”, अशी मिश्किल टीप्पणीही केली. यावेळी सभागृहात जोरात हशा पिकला.

अभिभाषणाच्या सुरुवातीलाच महापुरुषांचा उल्लेख

पुढे बोलताना ते म्हणाले, एकनाथ खडसे यांनी भाषण ऐकले नाही आणि वाचलंही नाही. ते अनुभवी नेते आहेत, राज्यपालांच्या भाषणात साधारणपणे काय असतं, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना वाचायची गरजच वाटली नसावी, पण राज्यपालांच्या अभिभाषणाच्या सुरुवातीलाच शिवजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचा उल्लेख आहे.

हेही वाचा – “मासिक पाळीच्या रक्ताची ५० हजार रुपयांना विक्री, मग…”, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

एकनाथ खडसे यांची विधानपरिषदेच्या गटनेतेपदी निवड

दरम्यान, आज एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीनंतर कार्यकर्त्यांकडून जळगावात जल्लोष करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 21:27 IST