मुंबई : बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने नकार देत त्याबाबतची त्याची याचिका फेटाळून लावली.

हे ॲप बेकायदेशीर असून त्यात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतले आहेत. यासाठी बनावट बँक खाती उघडण्यात आली होती. त्यासाठी वेगवेगळ्या बनावट सिमकार्डचा वापर करण्यात आला. याचिकाकर्ता हा द लायन बुक २४७ या बेकायदेशीर ॲपशी थेट जोडलेला आहे. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता याचिकाकर्त्याला दिलासा देता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकलपीठाने साहिल खान याची याचिका फेटाळताना नमूद केले. तसेच, या ॲपशी संबंधित ६७ बेटिंग संकेतस्थळे असून ती सर्व परदेशातून नियंत्रित केली जात होती. त्यासाठी, दोन हजारहून अधिक बनावट सिमकार्ड वापरली गेली.

हेही वाचा…आरबीएल बँकेची १२ कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह ११ जणांवर गुन्हा, बँकेच्या दक्षता विभागाची तक्रार

सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले गले. त्याचप्रमाणे, बनावट कागदपत्रांच्या आधारावर उघडलेली १७०० हून अधिक बँक खाती पैसे गोळा करण्यासाठी वापरली गेली. त्यानंतर, पैसे हवाला आणि कूटचलनाद्वारे (क्रिप्टोकरन्सी) वळविण्यात आल्याचे सकृतदर्शनी निरीक्षणही न्यायालयाने साहिल खान याची याचिका फेटाळूना नोंदवले.

हेही वाचा…कोकणातील वंदे भारतचा प्रवास दोन तासांनी वाढणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारे माटुंगा येथे साहिल खान याच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, पंधरा १५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली होते. साहिल खान हा या संघटित गुन्हेगारीत सहभाग असल्याचा संशय असल्याचा आणि द लायन बुकच्या नावाआडून साहिल हा एक बेकायदा बेटिंग संकेतस्थळ चालवत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.