मुंबई : वांद्रे येथे चार वर्षांच्या गतिमंद मुलाला गृहसेविकेने बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाणीची चित्रफित व्हॉटस ॲपवर पसरल्यानंतर मुलाच्या आईला या प्रकाराबाबत समजले.

पीडित मुलगा चार वर्षांचा असून गतिमंद आहे. तो भायखळा येथे आई – वडिलांसोबत राहतो. या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी ललिता सौनापात्रावालावर सोपविण्यात आली होती. मागील अडीच वर्षांपासून ती या मुलाला सांभाळत आहे. ललिता २१ जून रोजी गाडीने मुलाला फिरवण्यासाठी वांद्रे येथील मॉलमध्ये घेऊन गेली होती. मॉलमध्ये तिने या मुलाला बेदम मारहाण केली. तसेच जिन्यावरून फरफटत नेले. मारहाण सुरू असताना तिथे उपस्थित एका महिलेने या प्रकाराची चित्रफीत तयार करून व्हाट्स ॲप समूहात प्रसारित केली. ही चित्रफीत २३ जून रोजी मुलाच्या आईला मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी मुलाच्या आईने ललिता सौनापात्रावाला विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात अल्पवयीन न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.