मुंबई: हिरे व्यापाऱ्यांचे व्यवहार जरी चोख असले तरी त्यांची फसवणूक होत असते. बीकेसी येथील एका प्रसिध्द हिरे व्यापाऱ्याची एकाने तब्बल २५ लाखांची फसवणूक केली आहे. १५ दिवसात पैसे देतो अशा थापा मारून २२ दिवसात ३ वेळा हिरे उधीरीवर विकत घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी केयुर शहा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार संकेत जोगाणी (४४) हे नेपियन्सी रोड येथे राहतात. त्यांची वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथे एस जोगाणी जेम्स आणि जोगाणी इम्पेक्स अशा दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या मार्फत ते हिरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असतात. त्यांना एका इसमाने हिरे खरेदी करण्याच्या नावाखाली २५ लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना २०२४ मध्ये घडली आहे. याप्रकरणी उशीरा तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

२२ दिवसात ३ वेळा थापा मारून हिरे नेले.२०२४ मध्ये तक्रारदार संकेत जोगाणी यांचे परिचित अमित शहा आणि अंकित शहा यांच्या मार्फत संकेत जोगाणी यांची ओळख केयुर शहा (४४) याच्यासोबत झाली होती. केयूर शहा याने त्याची आशा ज्वेल नावाची कंपनी असल्याचे सांगितले होते. अंकित आणि अमित या दोघांनीही केयूर शहा याला ओळखत असल्याचा दाखला दिला होता. २९ फेब्रुवारी २०२४ मध्ये केयुर शहा याने जीएच रंगाचे एलबी प्रकारचे हिऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

१२ लाखांचे ४२. १५ कॅरेटचे हिरे विकत दिले होते. १५ दिवसांनी त्याचे पैसे देणार असल्याचे केयुर शहा याने सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी केयुर शहा भेटायला आला. मार्च महिना असल्याने मार्केट मध्ये पैसे नसल्याने लवकरच पैसे देईन अशी थाप मारली होती. तक्रारदार जोगाणी यांचा विश्वास बसला. यानंतर त्याने जोगाणी यांच्याकडून १ लाख ३८ हजारांचे आणखी हिरे विकत नेले.

तिसऱ्या वेळेस केयूर शहा याने पुन्हा हिरे विकत घ्यायला आला. यावेळी त्याने धनादेश दिले होते. सुमारे २५ लाखांचा व्यवसाय झाल्याने जोगाणी खूश होते. मात्र हे धनादेश वटलेच नाही. त्यामुळे जोगाणी यांनी केयूर शहा याला संपर्क केला. वारंवर तो वेगवेगळी कारणे देऊन टाळू लागला. १ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ या २२ दिवसांच्या कालावधीत ३ वेळा केयूर शहा हा जोगाणी यांच्याकडून थापा मारून हिरे घेऊन केला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी वांद्र्याच्या बीकेसी पोलीस ठाण्यात केयूर शहा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिसांनी केयूर शहा याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.