मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे आलेल्या देहरादून एक्स्प्रेसमध्ये १४ ते १५ वयोगटातील मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वांद्रे टर्मिनसवरील फलाट क्रमांक ३ वर रविवारी देहरादून एक्स्प्रेस आली. त्यावेळी आपतकालीन खिडकीतून मुलगा रेल्वेत दाखल झाला. त्यानंतर आसनावरील लोखंडी साखळीच्या सहाय्याने गळाफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

हेही वाचा : मुंबईत अश्लील व्हिडिओ चित्रीकरण प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; दोन अभिनेत्रींसह एका अभिनेत्याला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वेची तपासणी करीत असताना त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत मुलाची ओळख अद्याप पटलेली नसून वांद्रे रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली. मृत मुलगा दिल्लीतील रहिवासी असल्याच समजते. त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.