मुंबई: राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत देशभरात आयुष जिल्हा रुग्णालये उभारून त्याच्या माध्यमातून आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी तसेच योगा व निर्सगोपचार आणि वृद्धापकाळातील उपचार देण्याचे धोरण स्वीकारले असून त्याअंतर्गत राज्यात १४ स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापैकी अहमदनगर, पुणे व नंदूरबार येथे ३० खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण होऊन रुग्णालयांचे काम सुरु झाले आहे.

महाराष्ट्रात दोन ते पाच लाख लोकसंख्येसाठी ३० व ५० खाटांची चौदा रुग्णालये सुरु करण्यात मान्यता देण्यात आली असून यासाठी बांधकामाचा खर्च दहा ते पंधरा कोटी रुपये येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्णसेवा तसेच रुग्णांना दाखल करून उपचार देण्यात येणार असून साधारणपणे प्रत्येक रुग्णालयात ६० ते ७० पदे असतील तसेच विशेषज्ञांची सात पदे असणार आहेत. भारती जीवनपद्धतीत आयुर्वेदिक उपचार हे प्राचीन काळापासून अस्तित्वात असून आयुर्वेदिक उपचार पद्धतीने गुण येण्यास काहीसा विलंब होत असला तरी आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे कल वाढतो आहे. रोगाच्या मुळाशी जाऊन आजार नष्ट करण्याला आयुर्वेदात प्राधान्य असल्याने अलीकडच्या काळात पर्यायी उपचार म्हणून एक मोठा वर्ग आयुर्वेदिक उपचार घेताना दिसतो. तसेच पंचकर्म करणाऱ्यांची संख्याची वाढत असून आरोग्य विभागाच्या आयुष दवाखान्यांमध्येही मोठ्या रुग्ण उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे होमिओपॅथी उपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आयुष जिल्हा रुग्णालयात रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतील असा विश्वास आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – मुंबई : पत्राचाळीत सर्वसामान्यांसाठी म्हाडाची आणखी १,४५६ घरे

त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गरज ओळखून स्वतंत्र आयुष रुग्णालय ठाण्यात उभरणार आहे. वागळे इस्टेट येथील सिव्हील रुग्णालयाच्या प्रांगणात ५० खाटांच्या जिल्हा आयुष रुग्णालयात आयुर्वेदिक, होमियोपॅथी, युनानी lसारख्या उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार होतील. त्यामुळे पंचकर्म सेंटर, शिरोधारा, वमन बस्ती सारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहेत. अहमदनगर, पुणे व नंदूरबार येथील आयुष जिल्हा रुग्णालये अलीकडेच सुरु झाली असून येथे गेल्या वर्षभरात बाह्यरुग्ण विभागात ५२,११३ रुग्णांनी उपचार घेतले तर १७३४ रुग्णांवर दाखल करून उपचार करण्यात आले. अहमदनगर येथील आयुष जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ३४,०७३ रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले तर पुणे येथे १४,४४८ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. राज्यात सध्या १४ आयुष जिल्हा रुग्णालये मंजूर असून आगामी काळात आणखी २० जिल्ह्यात आयुष जिल्हा रुग्णालये सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मंजूर असलेल्या १४ रुग्णालयांमध्ये ठाणे, नागपूर, जालना, धाराशिव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर तसेच गडचिरोली येथे ५० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात येणार असून जळगाव, वर्धा व गोंदिया जिल्ह्यात ३० खाटांची आयुष रुग्णालये सुरु केली जातील.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठातून यंदा ४०१ स्नातकांना पी.एचडी, मुंबई विद्यापीठाचा मंगळवारी पदवी प्रदान सोहळा

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अॅलोपॅथी उपचारा इतकेच आयुर्वेदिक उपचारावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळें दीर्घ आजार असणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे वळताना दिसतात. मात्र काही वेळा आयुर्वेदिक खर्च खिशाला परवडणारा नसतो. आता ठाण्यात जिल्हा आयुष रुग्णालय उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत जिल्हा आयुष रुग्णालयाचे काम येत्या काही दिवसातच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.आयुष रुग्णालय बांधण्यासाठी १५ कोटी मंजुर झाले आहेत. रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामुग्री, औषधी व निवासस्थाने इत्यादींचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आला आहे. तळ अधिक तीन मजली इमारतीत ५० खाटा असणाऱ्या रुग्णालयात योगा, प्रतिक्षालय, अभिलेख, प्रक्रिया, मुख्य वैद्यकीय कक्ष आयुर्वेद कक्ष, स्वच्छता गृह, होमियोपॅथी कक्ष, युनानी, प्रयोगशाळा, नॅचेरोपॅथी, आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच पंचकर्म, क्षारसूत्र आदी आयुष उपचार होणार आहेत. वृद्धापकालीन (जेरियाट्रिक) रुग्णोपचाराचे महत्त्वही मोठे असून ॲलोपॅथीबरोबरच वृद्धापकाळात पर्यायी उपचार म्हणून आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी औषधोपचार घेण्याकडे कल वाढत असून या रुग्णालयांमध्ये त्याचा फायदा जेरियॅट्रिक रुग्णांना नक्कीच होईल असा विश्वास आरोग्य विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.