महाराष्ट्रातील राजकारणाचे भविष्यमंथन!

‘लोकसत्ता’तर्फे प्रमुख नेत्यांशी ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ दूर-संवादमाला

‘लोकसत्ता’तर्फे प्रमुख नेत्यांशी ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ दूर-संवादमाला

विविध राजकीय पक्ष, त्यांचे नेते यांची ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच कुतुहलाचे, क्वचित कौतुकाचे आणि प्रसंगी क्रोधाचेही कारण राहिलेले आहे. महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन साजरा करीत असताना आगामी काळात त्यांचे हे राजकारण कसे असेल हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘लोकसत्ता’ची ही ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही दूर-संवादमाला. आगामी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशा सहा पक्षांचे प्रमुख नेते या उपक्रमातील वेबसंवादात जनतेशी मुलाखतीतून संवाद साधतील.

देशातील सर्वात प्रगतशील महाराष्ट्र राज्याची भविष्यातील वाटचाल कशी असेल  याबाबत नेहमीच उत्सुकता असते. करोनामुळे गेली दोन वर्षे राज्याला कठोर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अन्य राज्यांची स्पर्धा असली तरी विदेशी गुंतवणुकीपासून औद्योगिक, सेवा क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, स्थावर मालमत्ता यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिले. या पार्श्वभूमीवर पुढील दहा वर्षांत महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या मार्गाने होईल, त्या वाटचालीतील राजकीय आव्हाने, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा आढावा या नेतेमंडळींकडून घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ६०व्या वर्धापनदिनानिमित्त गेल्या वर्षी झालेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेब संवाद कार्यR मात गेल्या वर्षी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांनी  राज्याने कशी प्रगती केली याचा आढावा होता. ‘दृष्टी आणि कोन’ या वेब संवादातून भविष्याचा वेध घेतला जाणार आहे.

सहा दिवसांत.. पुढील आठवडय़ात ३१ मेपासून ५ जूनपर्यंत दररोज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या वेब संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे भूमिका मांडणार आहेत. समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादाने होईल.

ऑनलाइन सहभागासाठी..

या दूर-संवाद मालेत सहभागी होण्यासाठी http://tiny.cc/LS_Drushti_ani_Kon येथे नोंदणी आवश्यक.

क्यूआर कोडद्वारेही सहभागी होता येईल.

प्रायोजक

* प्रस्तुती :  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

* सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta initiative six parties leading leaders interacting with the public through webinar zws