उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबई आणि महानगरमधील पायाभूत प्रकल्पांसाठी विशेषतः मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे. या भागात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई या प्रमुख महापालिकांच्या निवडणूका अजुन झाल्या नसून सर्वोच्च न्यायालयाचा राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल लागल्यावर पुढील काही दिवसात अपेक्षित आहेत आहेत. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच या भागातील मेट्रो प्रकल्पांना वेग देण्यासाठी मोठी तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे.

मुंबईत या वर्षी आणखी ५० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरु होतील असं अर्थमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. तसंच मुंबई मेट्रो १० – गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड, मुंबई मेट्रो ११ – वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई मेट्रो १२ -कल्याण ते तळोजा या मेट्रो प्रकल्पांची कामे सुरु होतील असं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रोचा आराखडा अंतिम केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा… Maharashtra Budget 2023-2024 Live: देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या तरतुदी? वाचा सविस्तर!

मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी विशेष लक्ष घातलेल्या मुंबई शहराच्या सुशोभिकरणाच्या कामांसाठी तब्बल १७२९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एमएमआर क्षेत्रातील शिळफाटा इथला पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा प्रकल्प, मुंबई पारबंदर प्रकल्प यावर्षी पूर्ण होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसंच ठाणे-वसई खाडी हे जलवाहतुकीने जोडण्यासाठी ४२४ कोटी रुपयांची खास तरतूद करण्यात आली आहे. कल्याण- मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठाही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

हेही वाचा… Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय तरतूद; जाणून घ्या एका क्लिकवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई शहर आणि मुंबई महानगर भागाची लोकसंख्या ही दोन कोटीच्या घरात आहे, तेव्हा या भागावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पुरेपूर करण्यात आल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.