मुंबई : पनवेल येथे तांत्रिक कामांसाठी आणि मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात आल्यानंतर आता पनवेल येथे सोमवारी रात्रीपासून ते शुक्रवापर्यंत पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.  ब्लॉक कालावधीत सोमवारी ते शनिवापर्यंत रात्री १२.३० वाजल्यापासून ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत या मार्गावर लोकल धावणार नाही.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील अप आणि डाऊन दोन नवीन मार्गिकेच्या बांधकामासाठी आणि उपनगरीय यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी पनवेल येथे शनिवार व रविवारी ब्लॉक घेतला. त्यानंतर पनवेल येथे तांत्रिक दुरुस्तीनंतरची काम करण्यासाठी ईएमयू स्टॅबिलग साइिडग क्रमांक १,२,३,४ आणि १० येथे पाच दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. आता पाच दिवस रात्री या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकपूर्वीचे वेळापत्रक

ब्लॉकपूर्वी हार्बर मार्गावर पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता सीएसएमटीवरून सुटेल. ती लोकल रात्री १२.१८ वाजता पनवेल येथे पोहचेल. ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून रात्री ११.३२ वाजता सुटेल आणि रात्री १२.२४ वाजता पनवेलला पोहोचेल. हार्बर मार्गावर पनवेलहून शेवटची लोकल ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल. तर, अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल रात्री १०.१५ वाजता पनवेलहून सुटेल आणि रात्री ११.०७ वाजता ठाण्याला पोहोचेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्लॉकनंतरचे वेळापत्रक

ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी येथून पनवेलसाठी ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल. ३ ते ७ ऑक्टोबपर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉक संपल्यानंतर पहिली लोकल सकाळी ६.२० वाजता ठाण्याहून सुटून सकाळी ७.१२ वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेलहून अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेलहून पहाटे ५.४० वाजता सुटेल आणि सकाळी ६.५९ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेलहून अप ट्रान्सहार्बर मार्गावर ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल सकाळी ६.१३ वाजता पनवेलहून सुटेल आणि सकाळी ७.०५ वाजता ठाण्याला पोहोचेल.