Mumbai Breaking News Updates :मुंबई शहरात बुधवारी काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. दरम्यान, गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नागपूर, पुणे आणि मुंबईतील बातम्या Live Blog च्या माध्यामातून जाणून घ्या.

Live Updates

Mumbai News updates 5 June 2025

11:08 (IST) 6 Jun 2025

उन्हाळी सुट्टीत पावसाळी सहलीचा आनंद

बहुसंख्य पालकांनी मुलांना घेऊन फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. विशेषत: एक ते दोन दिवसीय सहलींना नागरिकांची पसंती असून विविध ठिकाणच्या वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत. ...सविस्तर बातमी
10:45 (IST) 6 Jun 2025

जोतिबा डोंगर परिसरातील जंगलाची पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ नावाने निर्मिती ; भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार, फडणवीस सरकारचा संकल्प

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प सोडण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. ...सविस्तर वाचा
01:26 (IST) 6 Jun 2025

केईएम रुग्णालयात लवकरच अस्थिमज्जा प्रत्यारोपणमुलांसोबत प्रौढांवरही होणार उपचार

ल्युकेमिया, लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा, ॲप्लास्टिक ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि सिकल सेल यांसारख्या रक्तविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपण ही उपचार पद्धती महत्त्वपूर्ण ठरते. ...वाचा सविस्तर
01:17 (IST) 6 Jun 2025

हवामान बदलाच्या समस्यांबाबत विद्यार्थी उदासीन

हवामान बदलाचा मुलांवर काय परिणाम होतो आणि त्यांना या बदलांविषयी किती माहिती आहे, हे जाणून घेण्यासाठी मुंबईतील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रश्नावली देण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
23:43 (IST) 5 Jun 2025

इगतपुरी ते आमणे टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; आता आठ तासात मुंबई ते नागपूर प्रवास शक्य

या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास अतिजलद होणार आहेच, पण या महामार्गामुळे राज्याचा आर्थिक, औद्योगिक विकासही साधला जात आहे. त्यामुळे हा महामार्ग म्हणजे राज्याच्या आर्थिक समृद्धीचा महामार्ग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...सविस्तर बातमी
23:29 (IST) 5 Jun 2025

बसस्थानकाच्या जागी व्यापारी संकुलाचा घाट? आम आदमी पक्षाचा आरोप

एसटी महामंडळाच्या शिवाजीनगर येथील बसस्थानकाच्या जागेवर महामेट्रोचे स्थानक उभारण्याचे काम सुरू असून, संबंधित स्थानक वाकडेवाडी येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. ...वाचा सविस्तर
22:52 (IST) 5 Jun 2025

एकल वापरातील प्लास्टिक राक्षस; मंत्री पंकजा मुंडे असे का म्हणाल्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमाने पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...वाचा सविस्तर
22:35 (IST) 5 Jun 2025

अलमट्टी बाबत सरकारचा धोरण गोंधळ ;‘आयआयटी’चा अहवाल ठरणार कळीची

राज्य सरकार अलमट्टी बाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे जलसपंदा विभागाने या बाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. ...अधिक वाचा
22:34 (IST) 5 Jun 2025

शहरबात : मनसे’ला जेव्हा जाग येते…

पडझडीनंतर हे पदाधिकारी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी नव्या सवंगड्यांच्या शोधात निघाले असल्याने त्या निमित्ताने का होईना ‘मनसे’ जागी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...वाचा सविस्तर
22:14 (IST) 5 Jun 2025

सावधान! मुंबईनंतर आता पुण्यात करोनाच्या धोक्यात वाढ; गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ

राज्यात १ जानेवारी ते ५ जूनपर्यंत १४ हजार ५६५ संशयित करोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ हजार १६२ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक ५७५ रुग्णांची नोंद झाली आहे. ...अधिक वाचा
21:35 (IST) 5 Jun 2025

शहरातून पुणे विमानतळापर्यंतचा प्रवास अत्यंत जिकिरीचा; चित्र बदलण्याचे मराठा चेंबरचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांचे आवाहन

‘या रस्त्यांवर होणारी अतिक्रमणे काढून, बेकायदा उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. तसेच, सुंदर आणि स्वच्छ पुण्याची ओळख दाखवून द्यावी,’ ...वाचा सविस्तर
20:35 (IST) 5 Jun 2025

अंधेरी लोखंडवाला परिसरात पुनर्विकासाचे पेव; बांधकामाच्या आवाजाने रहिवासी त्रस्त

रात्री अपरात्री, मध्यरात्री, पहाटे कधीही जोरजोरात आवाजात सुरू असलेल्या या कामांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच या परिसरात प्रचंड ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण होत असून राडारोडा वाहून नेत असल्यामुळे परिसरातील रस्त्यावर पावसाळ्यात चिखल होऊ लागला आहे. ...वाचा सविस्तर
19:45 (IST) 5 Jun 2025

कोकणात उभारला विनामूल्य पंचतारांकित वृद्धाश्रम; सातासमुद्रापार कीर्ती संपादन केलेल्या डॉक्टर बंधूंची सामाजिक बांधिलकी.

टोकोडे येथे उभारलेला ‘मिलन’ नावाचा हा पंचकारांकित वृद्धाश्रम ही कोकणातील गरीब आणि गरजू वयोवृद्धांचे उत्तरायुष्य समृद्ध व समाधानी करणारी अनोखी देणगी ठरत आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले आणि कोकणात विकासाबरोबरच माणुसकीलाही बहर आला… ...वाचा सविस्तर
16:36 (IST) 5 Jun 2025

गृहनिर्माण प्रकल्पाचा संपूर्ण तपशील असलेले प्रमाणपत्र महारेरा जारी करणार!

महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते, हे लक्षात घेऊन ग्राहकाभिमुख अमुलाग्र बदल केले आहेत. ...सविस्तर वाचा
16:10 (IST) 5 Jun 2025

Video : आईची माया अन् मायेची छाया… टिपेश्वरच्या ‘फोर मार्क’ वाघिणीचे ममत्व पाहून नक्कीच भारावून जाल

अलीकडच्या काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढत आहे. मनुष्यबळीचा ठपका ठेऊन मारण्यात आलेली ‘अवनी’ वाघीण जेवढी प्रसिद्ध होती, तेवढीच आता ‘फोर मार्क’ नावाची वाघीण टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करत आहे. ...सविस्तर वाचा
13:17 (IST) 5 Jun 2025

नागपुरात भाजपची निवडणूक लगबग, तयारीत आघाडी

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य निवडणूक आोगाला एक महिन्यापूर्वीच सांगितले होते. तेव्हापासूनच भाजपने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. ...वाचा सविस्तर
13:00 (IST) 5 Jun 2025

पाकिस्तानात गेलेल्या सुनीताच्या मोबाइलमध्ये संशयास्पद अ‍ॅप्स

पाकिस्तानात पायी गेलेल्या नागपूरच्या सुनीता जामगडे यांच्या चौकशीत दररोज नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांना त्यांच्या मोबाइलमध्ये काही संशयास्पद अ‍ॅप्स सापडले आहेत. ...सविस्तर बातमी
12:45 (IST) 5 Jun 2025

गडकरी, फडणवीसांसोबत राहतो म्हणून संस्कारी, प्यारे खान यांचा नितेश राणे यांना टोला

राणे यांनी ईदला बकरे न कापता इकोफ्रेंडली ईद साजरी करावी. बकरे कापल्याने हिंदू समाजाला त्रास होतो. तसेच त्यामुळे तणाव निर्माण होतो, असे वक्तव्य केले होते. ...अधिक वाचा
12:04 (IST) 5 Jun 2025

'कडू' सवाल : झेपणार नव्हते तर आश्वासने लादली कशाला? बच्चू कडूंचा व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांवर प्रहार

बच्चू कडू यांनी सरकारविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात एक व्यंगचित्र तयार करून थेट सरकारला प्रश्न विचारले आहेत. ...सविस्तर वाचा
11:27 (IST) 5 Jun 2025

वाघ, बिबट्यांचे हल्ले रोखणार! एआय आधारित नवीन अलर्ट सिस्टीम…

वाघांसह बिबट्याचे होणारे हल्ले रोखण्यासाठी एआय आधारित नवीन अलर्ट सिस्टीम लावली जाणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. ...वाचा सविस्तर
11:11 (IST) 5 Jun 2025

भंडारा : बसची ट्रॅक्टरला धडक, ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू; बसचालकावर गुन्हा दाखल

ट्रॅक्टरला भरधाव बसने मागेहून धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ४ जून रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर विर्सी फाटा येथे घडली. ...सविस्तर बातमी
10:40 (IST) 5 Jun 2025

शेणखत घोटाळा : चंद्रपूर जिल्ह्यातील आठ वन अधिकारी निलंबित

शेणखत खरेदी घोटाळ्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षकांनी पाच वनरक्षक आणि दोन वनपालांना निलंबित केल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. ...सविस्तर बातमी
10:23 (IST) 5 Jun 2025

शिक्षण विभागात भीती! शिक्षण आयुक्तांची पोलीस आयुक्तांशी चर्चा, चौकशीशिवाय कुणालाही…

शालार्थ आयडी घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांना आतापर्यंत अटक झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याचा परिणाम दैनंदिन कार्यालयीन कामावरही होत आहे. ...अधिक वाचा
10:15 (IST) 5 Jun 2025

अंतर्गत जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणाचे प्रशिक्षण

जलस्त्रोतांना दुषित आणि प्रदुषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणांची गरज ओळखुन शासन स्तरावरुन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. ...अधिक वाचा
09:52 (IST) 5 Jun 2025

मुंबईत आज विजांच्या कडकडाटासह मध्यम सरी

मुंबई : शहरात बुधवारी काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. दरम्यान, गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा....

09:51 (IST) 5 Jun 2025

रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यास परवानगी

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला १ जून ते १५ सप्टेंबरदरम्यान व्यावसायिक कामांसाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या रिया हिला चित्रीकरण करण्यासाठी श्रीलंका, सर्बिया आणि विविध युरोपीय देशांमध्ये जायचे आहे.

सविस्तर वाचा....

Mumbai News Live Updates, Mumbai News Live Today in Marathi,

मुंबई महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)