Latest News in Mumbai Today : पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामाना सुरुवात झाली आहे. नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेनंतर शहर आणि उपनगरांसाठी मिळून २३ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना धमकीचा ई-मेल आला. या प्रकरणी पोलिसांना तक्रार प्राप्त झाली आहे. त्याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून घेता येईल…
Live Updates
Mumbai Maharashtra News Today, 22 April 2025
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर; ५४९ इमारतींच्या संरचनात्मक तपासणीचा अहवाल प्राप्त
अतिधोकादायक घोषित झालेल्या इमारतींना आता मंडळाने निष्कासनासह नवीन पुनर्विकास धोरणाअंतर्गत ‘७९ अ’ची नोटीस बजावण्यात येत आहेत. ...वाचा सविस्तर
अभिनेता टायगर श्रॉफ धमकीप्रकरणी आरोपी पंजाबमधून ताब्यात; पगार कापला म्हणून दिली धमकी
कामावर गैरहजर असल्यामुळे त्याचा पगार कापण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी हा प्रकार केला. ...अधिक वाचा
मोबाइलवरून झाला वाद… इमारतीतून ढकलल्याने मृत्यू… हत्येचा गुन्हा दाखल, आरोपीला अटक
याप्रकरणी मृत व्यक्तीला धक्का देणाऱ्या २५ वर्षीय आरोपीविरोधात कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
तापमानवाढीमुळे आरोग्य धोक्यात… उलट्या, जुलाब व काविळीच्या रुग्णसंख्येत वाढ…
असह्य उकाड्यामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी रस्त्यावरील सरबत, ताक आदींच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. परिणामी, उलट्या, जुलाब व काविळीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ...सविस्तर वाचा
मानखुर्द आग दुर्घटना : जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
मानखुर्दच्या जनता नगर परिसरत वास्तव्यास असलेले शहाबाज खान यांच्या घरात सोमवारी रात्री ८ च्या सुमारास आग लागली होती ...वाचा सविस्तर
मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! जूनच्या पहिल्याच आठवड्यात मोसमी पाऊस येतोय…
यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. ...वाचा सविस्तर
मुंबईतील नालेसफाईसाठी यंदा २३ कंत्राटदार! पाणी तुंबण्याचे प्रकार यंदा कमी होणार?
यावर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यांत नाल्यांमधील एकूण गाळाच्या ८० टक्के गाळ काढण्यात येईल, तर पावसाळ्यादरम्यान १० टक्के आणि पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
अन्यथा सरोगसीचे व्यावसायिकीकरण होईल; महिलेला तिसऱ्या मुलासाठी सरोगसीची परवानगी नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
तिला पुनर्विवाह देखील करायचा नाही. परंतु, तिला आई व्हायचे आहे. त्यामुळे, ३६ वर्षांच्या या महिलेने सरोगसीच्या माध्यमातून तिसऱ्यांदा आई होण्याचा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर बातमी
विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक, अंपगांसाठी सुविधा नसणे अयोग्य; उच्च न्यायालयाची टिप्पणी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअर आणि इतर सुविधांच्या अभावाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या दोन याचिकांवरील सुनावणीवेळी न्यायालयाने उपरोक्त मुद्याबाबत चिंता व्यक्त केली. ...अधिक वाचा
वांद्रे - वर्सोवा सागरी सेतू : सेतूवरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर येणे होणार सोपे, जुहूतील दोन आंतरबदल मार्गाच्या लांबीत अखेर वाढ
एमएसआरडीसी १७.१७ किमी लांबीचा आणि अंदाजे सात हजार कोटी रुपये खर्चाचा वांद्रे - वर्सोवा सागरी सेतू बांधत आहे. वरळी - वांद्रे सागरी सेतूचा हा विस्तार आहे. ...वाचा सविस्तर
अभिनेता टायगर श्रॉफला मारण्यासाठी २ लाख व ‘हत्यार’? पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या दूरध्वनीने खळबळ!
पंजाबमधून मनिष कुमार सुजिंदर सिंह (३५) नावाच्या व्यक्तीने हा दूरध्वनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ...सविस्तर बातमी
माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना धमकीचा ई-मेल
माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना यापूर्वीही ऑक्टोबर महिन्यात धमकीसाठी दूरध्वनी आला होता. ...सविस्तर बातमी
हार्बर मार्गावर गारेगार प्रवास; चेन्नईमधून मुंबईत दाखल झालेली वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत
हार्बर मार्गावर नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल झाली आहे.
...सविस्तर बातमी
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स
