Mumbai Breaking News Today, 10 July 2025 : प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसाठी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजाचे बुधवारी (काल) पुन्हा एकदा हसे झाले. विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात दिवसभर शहर आणि उपनगरातही रिमझिम पाऊस पडला. हवामान विभागाने मात्र न झालेला मुसळधार पाऊस आजपासून ओसरण्याचा अंदाज वर्तवला आहे.

तसेच मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील कांबळी वाडी परिसरातील जैन मंदिराचे अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत मुंबई महापालिकेने केलेली कारवाई ही एमआरटीपी कायद्याच्या नियमानुसार करण्यात आली असून ती योग्यच असल्याचा निर्वाळा न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी मंगळवारी सुनावणीच्या वेळी दिला. त्यामुळे याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांनी केलेली कारवाई बरोबर होती, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतील तसेच राज्याच्या इतर भागांतील ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Nagpur Pune Mumbai Breaking News Updates in Marathi

21:43 (IST) 10 Jul 2025

कृषिमंत्र्यांच्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांना दिलासा; वाचा, पीकविम्याची भरपाई कुणाला मिळणार

राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२४ च्या विमा हप्त्यासाठी तब्बल १०२८.९७ कोटी रुपयांचा निधी देण्यास तत्काळ मंजुरी देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ...सविस्तर वाचा
21:18 (IST) 10 Jul 2025

पवित्र पोर्टल बाबत मोठा निर्णय! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची नेमकी घोषणा काय?

पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास पुढील भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्रुटी दूर केल्या जातील, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. ...सविस्तर वाचा
21:02 (IST) 10 Jul 2025

एक अर्ज करा आणि पोस्टात नोकरी मिळवा! परीक्षाही होणार नाही...

भारतीय टपाल सेवा, ज्याला इंडिया पोस्ट म्हणूनही ओळखले जाते. हा भारत सरकारचा एक विभाग आहे. ही टपाल सेवा प्रदान करते. ...अधिक वाचा
20:51 (IST) 10 Jul 2025

बुलेट ट्रेनच्या बोगद्याचे २.७ किमी खोदकाम पूर्ण

हा बोगदा दोन टप्प्यात उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील २.७ किमी लांबीच्या बोगद्याचे खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. ...वाचा सविस्तर
20:33 (IST) 10 Jul 2025

पश्चिम रेल्वेवर अत्याधुनिक इंडिकेटर

पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांवर अत्याधुनिक इंडिकेटर बसवण्यात आले असून प्रवाशांना दुरूनच इंडिकेटरवरील माहिती दिसून शकेल. त्यामुळे प्रवाशांना लोकलचे वेळापत्रक सुस्पष्टपणे दिसणार आहे. ...सविस्तर वाचा
19:57 (IST) 10 Jul 2025

एका प्रेमकथेच्या अरेंज मॅरेजची गोष्ट, ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा हटके टीझर प्रदर्शित

ज्याप्रमाणे 'प्रेमाची गोष्ट'ने संवेदनशील विषयावर भाष्य करीत मनोरंजन केले, त्याप्रमाणे काही तरी अधिक प्रभावी 'प्रेमाची गोष्ट २' मध्ये पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
19:39 (IST) 10 Jul 2025

मराठीत काय कुंकू पूल म्हणायचे का? सिंदूरच्या नावावरून समाजमाध्यमांवर टीका

इथेही हिंदीच नाव का मराठी नाव मिळाले नाही का, मराठीत काय पुलाला कुंकू पूल म्हणायचे का असे सवाल मुंबईकरांनी उपस्थित केले आहेत. ...सविस्तर बातमी
19:22 (IST) 10 Jul 2025

महापालिकेतील खाजगीकरणाविरोधातील आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेतील २२ विभागांमध्ये खाजगीकरण करण्याचा घाट घातला असून या खाजगीकरणाला पालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहेत. ...सविस्तर वाचा
19:09 (IST) 10 Jul 2025

गणेशोत्सवाबाबत मोठी बातमी : गणेशोत्सवाला राज्य उत्सावाचा दर्जा; शंभर कोटींचा अतिरिक्त निधीही मंजूर

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्याबाबतची घोषणा गुरुवारी विधानसभेत केली. त्यामुळे शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...अधिक वाचा
18:42 (IST) 10 Jul 2025

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विलंब माफी अर्ज मंजूर; विरोधकांची मागणी फेटाळली

महाराष्ट्र साहित्य परिषदेने करोनाच्या कालखंडात निवडणुका घेणे शक्य नसल्याने वार्षिक सर्वसाधारण सभेस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. ...सविस्तर बातमी
18:36 (IST) 10 Jul 2025

आयटी अभियंत्याची दुर्मीळ विकारावर मात! सहा महिन्यांच्या दुखण्यानंतर पुन्हा कामावर जाण्यास सज्ज

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अभियंता असलेल्या एका महिलेला दुर्मीळ विकार झाला. तिच्या मणक्यात गाठ निर्माण झाल्याने तीव्र पाठदुखी सुरू झाली. ...सविस्तर बातमी
18:20 (IST) 10 Jul 2025

नेमोलिन मायोपेथी: दुर्मीळ पण गंभीर स्नायू विकाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण!

नेमोलिन मायोपेथी हा जन्मजात स्नायू विकार असून, यात शरीरातील स्नायू कमकुवत होतात, त्यांची वाढ खुंटते, आणि मुलांना चालण्यात व पायावर उभे राहण्यात अडचणी येतात. ...सविस्तर बातमी
18:10 (IST) 10 Jul 2025

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना खंडणीप्रकरणात क्लिनचीट…

माजी निवृत्त आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी ठाणे आणि त्यानंतर मुंबई पोलिस दलात आयुक्त पदावर काम केले. मात्र, निवृत्तीनंतर त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. ...अधिक वाचा
18:09 (IST) 10 Jul 2025

PCMC : खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष भोवले; पिंपरीतील २६ अभियंत्यांना नोटीस

पिंपरी-चिंचवड महापालिकेने यावर्षीपासून खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे ॲप विकसित करण्यात आले. ...सविस्तर बातमी
17:53 (IST) 10 Jul 2025

मानखुर्दमधील महापालिका शाळेतील पंखा पडला; गंभीर जखमी विद्यार्थिनीच्या डोक्याला सात टाके

मानखुर्द येथील चिताकॅम्प परिसरातील ट्रॅम्बे पोलीस ठाण्यालगतच्या लाल मैदानासमोरील पालिकेच्या शहाजीराजे मनपा उर्दू शाळा संकुलात पंखा कोसळून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. ...वाचा सविस्तर
17:49 (IST) 10 Jul 2025

ठाण्याच्या कोलशेत मार्गावर चिखल…वाहन घसरुन अपघातांची भिती

ठाणे महापालिका क्षेत्रात हवा प्रदुषणास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची मोहिम प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी हाती घेतली होती. ...सविस्तर वाचा
17:41 (IST) 10 Jul 2025

मध्य रेल्वेकडुन ज्येष्ठ नागरिकांना गुरूपौर्णिमेची अनोखी भेट; ज्येष्ठांसाठी स्वतंत्र डबा असलेली लोकल

ही लोकल गुरुवारपासून धावण्यास सुरुवात झाली असून, या लोकलच्या दिवसातून ७ ते १० फेऱ्या होतील. ...अधिक वाचा
17:22 (IST) 10 Jul 2025

मिठी नदी गाळ उपसा घोटाळा: एसआयटीकडे तपासासाठी तब्बल साडेतीन लाख फोटो; गाळात गुंतलेल्यांना बाहेर काढणार - उद्योग मंत्री उदय सामंत

मिठी नदीच्या गाळात कोण कोण गुंतले होते ते सर्व बाहेर काढल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. ...वाचा सविस्तर
16:52 (IST) 10 Jul 2025

होमिओपॅथी डॉक्टरांविरोधात आता ‘मार्ड’ही आंदोलनाच्या पवित्र्यात...

होमिओपॅथी डॉक्टरांनी औषधशास्त्र या विषयाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना ‘आधुनिक वैद्यकीय व्यवसायी’ म्हणून मान्यता देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात निवासी डॉक्टरही आक्रमक झाले आहेत. ...सविस्तर बातमी
16:51 (IST) 10 Jul 2025

… या निर्णयामुळे ‘पीएमपी’च्या अर्थचक्राला गती, उत्पन्नात लक्षणीय वाढ

पुणे साप्ताहिक सुट्ट्यांच्या कालावधीत सार्वजनिक वाहूतक व्यवस्थेला अल्प प्रतिसाद असल्याने गर्दी असलेल्या पर्यटन आणि धार्मिक ठिकाणी अतिरिक्त सेवा वाढवली.या निर्णयामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) उत्पन्नात लक्षणीय वाढ होत अर्थचक्राला गती मिळाली आहे. ...वाचा सविस्तर
16:44 (IST) 10 Jul 2025

‘धर्मवीर आनंद दिघे मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र’; थेट नामफलक झळकवून ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंना ठाणे जिल्ह्यातच काटशह

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेने कल्याण उपकेंद्राच्या भिंतीवर ‘धर्मवीर आनंद दिघे - मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र’ असा नामफलकच झळकावला. ...सविस्तर बातमी
16:42 (IST) 10 Jul 2025

मोठी बातमी : 'हिंजवडी आयटी पार्क' समस्यामुक्त करण्यासाठी 'सिंगल पॉइंट ॲथॉरिटी'; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींसोबत गुरुवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ...सविस्तर वाचा
16:30 (IST) 10 Jul 2025

कल्याणमधील व्यापाऱ्याला वालधुनी पुलावर रात्रीच्या वेळेत लुटले

गेल्या महिनाभरापासून कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागात दुचाकीवरून येऊन पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. ...सविस्तर बातमी
16:25 (IST) 10 Jul 2025

पुणे-मुंबई महामार्ग उड्डाणपुलाचा प्रस्ताव का रखडला... उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
16:24 (IST) 10 Jul 2025

इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही मराठी उत्तम शिकवले पाहिजे - माजी न्यायमूर्ती अभय ओक

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी विषयाचे उत्तम शिक्षण मिळाले तर, इंग्रजी माध्यमात मुले शिकत आहेत, याची काळजी आपल्याला राहणार नाही, असे मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडले. ...सविस्तर वाचा
16:24 (IST) 10 Jul 2025

लाडक्या बहिणींसाठी काम करणारे कल्याण, डोंबिवलीतील महिला बचत गट मानधनापासून वंचित

एका अर्जामागे ५० रूपये देण्याचे आश्वासन शासनातर्फे महिला बचत गट आणि संबंधितांना दिले होते. ...अधिक वाचा
16:05 (IST) 10 Jul 2025

तब्बल २५ वर्षांनंतर हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण

आता जून २००० मध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांना चितळसर, मानपाडा, टिकुजीनीवाडी प्रकल्पातच बहुमजली इमारतीत घर देण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. ...वाचा सविस्तर
15:43 (IST) 10 Jul 2025

१८ जुलैला राज ठाकरेंची तोफ मिरा भाईंदर मध्ये धडाडणार!

मीरा-भाईंदर येथील अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी ८ जुलै रोजी मनसे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चाला परवानगी नसल्याने अनेक मोर्चेकऱ्यांची तसेच मनसेच्या नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती. ...सविस्तर वाचा
15:25 (IST) 10 Jul 2025

पतीने चक्क गॅस सिलिंडर पत्नीच्या डोक्यात हाणले; चारित्र्यावरील संशयातून…

यवतमाळ येथील वाघापूर परिसरात बुधवारी रात्री उशिरा एका पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...वाचा सविस्तर
15:24 (IST) 10 Jul 2025

राज्यातील, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना तक्रार अर्ज

पुणे शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी या गंभीर घटनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने स्वारगेट पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल करण्यात आला. ...सविस्तर वाचा

Mumbai Nagpur Pune News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज १० जुलै २०२५