Mumbai News Updates Today 14th May 2025 : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वेळी काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. या बातम्या तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 14 May 2025
होर्डिंगविषयक नव्या धोरणाला मुहूर्त मिळेना… भोसले समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे महापालिकेचे कारण
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत पुन्हा अडथळा, न्यायालयाची प्रारुप मतदार यादीला स्थगिती
कोल्हापुरात संभाजी महाराज जयंती उत्साहात
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कोल्हापूरसह जिल्ह्यात उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने जन्मकाळ सोहळा, रक्तदान शिबिर, व्याख्याने, पोवाडे, मिरवणुका आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बाबा जरगनगरमधील संयुक्त धर्मवीर संभाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने जन्मकाळ सोहळा, चित्रकला स्पर्धा, अन्न महोत्सव, होम मिनिस्टर, हलगी वादन स्पर्धा, मिरवणूक आदी भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध व जल अभिषेक केला. जन्मकाळ सोहळा झाल्यावर रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
बिंदू चौकात संभाजी महाराज जयंती सोहळा धर्मवीर १४ मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. महाराजांचा २१ फुटी फायबरचा पुतळा विराजमान करण्यात आला होता. महाराजांची शौर्य कथा सांगणारा चरित्रपट दाखवण्यात आला.

