मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केल्यानंतर ईडीने बेनामी संपत्ती प्रकरणी देशमुखांना अटक केली. यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिलीय. “अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह फरार आहेत आणि तपासाला सहकार्य करणाऱ्या देशमुखांना अटक केली जात आहे. नेत्यांना घाबरवण्यासाठी हे केलं जातंय,” असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. तसेच आज नाही तर उद्या खऱ्या गोष्टी समोर येतीलच, असंही नमूद केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवाब मलिक म्हणाले, “अनिल देशमुख यांनी कायदेशीर तरतुदींचा वापर केला आणि सोमवारी (१ नोव्हेंबर) ते ईडीसमोर हजर झाले. त्यांना फसवण्यातआलं. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह फरार आहे. दुसरीकडे ज्याच्यावर आरोप आहे तो तपासाला सहकार्य करत चौकशीला हजर झाला त्याला अटक करण्यात आलीय. ही संपूर्ण कारवाई राजकारणाने प्रेरीत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी, नेत्यांना घाबरवण्यासाठी हे केलं जातंय. आता ट्वीट यायला लागले आहेत की पुढील अटकेची वेळ अनिल परब यांची आहे. हे नेत्यांना घाबरवणं आणि सत्तेचा दुरुपयोग करणं बंद व्हावं.”

“परमबीर सिंह कुठं आहे याची जबाबदारी केंद्र सरकारची”

“अनिल देशमुख यांना तुम्ही अटक केली आहे हे ठीक आहे. कायदा आपलं काम करेल. खोटारडेपणा करून लोकांना फसवला, आज नाही तर उद्या गोष्टी समोर येतील. मात्र, परमबीर सिंह कुठं आहे याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. परमबीर सिंह महाराष्ट्रातून पंजाब, चंदीगडला गेले. त्यानंतर परत आलेच नाहीत. ते परदेशात गेल्याचंही बोललं जातंय,” असं मलिक यांनी सांगितलं.

“परमबीर सिंह पळण्याचे तीनच मार्ग, तिन्ही ठिकाणी भाजपाचं सरकार”

“पळण्याचे तीनच मार्ग आहेत. लूक आऊट नोटीस असताना ते पळाले. एखादी व्यक्ती विमानाने, रोडने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारहून नेपाळ गेले असतील. तिन्ही ठिकाणी भाजपाचं सरकार आहे. इतर लोकांसारखंच परमबीर सिंह यांना पळून जाण्यास मदत केलीय का? परमबीर सिंह यांचा वापर करून सरकारवर खोटे आरोप करत बदनाम केलं. याचं उत्तर भाजपाला द्यावं लागेल,” असंही नवाब मलिक यांनी नमूद केलं.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उलाढालींचे मास्टर माइंड; नवाब मलिक यांचे गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाब मलिकांकडून लेडी डॉन उल्लेख करत व्हॉट्सअॅप चॅट जाहीर

नवाब मलिक म्हणाले, “मी जेव्हा लेडी डॉनचा उल्लेख केला तेव्हा म्हटलं गेलं की आमचा भाऊ प्रामाणिक अधिकारी आहे. आम्ही त्याच्या कामात हस्तक्षेप करत नाही. मी एक व्हॉट्सअॅप चॅट शेअर करतोय. यात यास्मीन वानखेडे ड्रग्ज प्रकरणात अटक आरोपीसोबत चॅट करतेय. हा प्रायव्हेट आर्मीचा खेळ होता. वसुलीच्या धंद्यात हे सर्व लोक होते. लेडी डॉन देखील या धंद्यात सहभागी होती.”