संघर्ष युनियनचा आंदोलनाचा इशारा
मुंबई : वेतन वेळेत न होणे, कर्जाचे हप्ते आणि आर्थिक परिस्थिती इत्यादी कारणांमुळे राज्यात एसटी कामगार आत्महत्या करू लागले आहेत. या कु टुंबांना जगविण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. शासन त्यांच्या जबाबदारीतून पळ काढत असल्याने त्यांना भानावर आणण्यासाठी संघर्ष एसटी कामगार युनियनतर्फे आंदोलनाचा इशारा सरचिटणीस शशांक राव यांनी दिला.
२९ ऑक्टोबर २०२१ ला औरंगाबादमध्ये, तर १२ नोव्हेंबरला मुंबई, १८ नोव्हेंबरला पुणे, २६ नोव्हेंबरला नाशिक, ३ डिसेंबरला अमरावती आणि ९ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आत्महत्या केलेल्या एसटी कामगारांच्या कुटुंबांना ५० लाख रुपये अर्थसाहाय्य देण्यात यावे आणि त्यांच्या वारसांना नोकरी द्यावी देण्यीच मागणी करण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी थकीत महागाई भत्ता द्यावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडे के ल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.