जयंत पाटील यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई :  केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला पूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मदत मिळायची तशी मदत मोदी सरकार आल्यापासून  महाराष्ट्राला व देशातल्या कोणत्याच राज्याला सध्या मिळत नाहीत. त्यामध्ये बरीच कमतरता व तूट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी त्यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर जयंत पाटील बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या योजनांमध्ये केंद्राचा मोठा हिस्सा असायला हवा. मात्र सध्या काही तसे दिसत नाही. तसेच पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून देशाची अर्थव्यवस्था चालवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फटका मध्यमवर्गीय आणि गोरगरिबांच्या खिशाला बसत आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.  इंधनावरील कर कमी करणे, आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे इंधन उपलब्ध करून देणे हे मोदी सरकारने केले तर त्यांचे कौतुक होऊ शकते. मात्र एक तारखेचे बजेट उत्तर प्रदेश आणि पंजाब या निवडणुका समोर ठेवून जाहीर केले जाईल आणि जे शेतकरी मधल्या काळात विरोधात गेले आहेत त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न भाजप करेल असे भाकीतही जयंत पाटील यांनी वर्तवले.  ‘व्हाय आय किल्ड गांधी’या चित्रपटाला विरोध होणे स्वाभाविक आहे. विविध मान्यवरांनी या आधीच त्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी २०१७ साली या चित्रपटात भूमिका केली होती. त्यावेळेस ते राष्ट्रवादीत नव्हते. आता त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन आत्मक्लेशसुद्धा केला आहे याकडे लक्ष वेधत तो वाद आता संपायला हवा असे त्यांनी सांगितले