खरडून गेलेल्या शेतीसाठी उपाययोजना

गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीसाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीची रक्कम या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्य़ांसह मराठवाडय़ातील दोन जिल्ह्य़ांना बसला होता.

खरडून गेलेल्या शेतजमिनीत फेर लागवड करणे अवघड ठरते. ही जमीन पुन्हा लागवडयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कष्ट उपसावे लागतात. पैशाची अडचण आणि इतरही कारणांमुळे अनेकांनी त्यांच्या जमिनी पडिक ठेवल्या होत्या. शेतकऱ्यांची मोठी हानी झाली होती. राज्यातील पाच जिल्ह्य़ांतील एकूण ५७७ हेक्टर जमिनीला याचा फटका बसला होता. त्यात नागपूर (१५८ हेक्टर), यवतमाळ (२.३८), औरंगाबाद (२८६.९५) जालना (१७.०४) व अकोला जिल्ह्य़ातील ८२ हेक्टर जमिनीचा समावेश होता. शासनाने तेव्हा मदतीची घोषणा केली होती. नागपूर जिल्ह्य़ात हिंगणा तालुक्यात खरडून गेलेल्या जमिनीचा समावेश अधिक होता. त्यानुसार गाळ वाहून गेलेल्या जमिनीसाठी प्रतिहेक्टर १२ हजार २०० रुपये, तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रतिहेक्टर ३७ हजार ५०० रुपये याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार होती. यासाठी सरकारने २ कोटी २१ लाख ८४ हजार रुपये मंजूर केले आहेत. शासनाने मंजूर केलेल्या निधीतून औरंगाबाद जिल्ह्य़ाला १ कोटी ७ लाख, जालना जिल्ह्य़ासाठी ६ लाख ३९ हजार, अकोला जिल्ह्य़ासाठी ५९.०५ लाख, यवतमाळ जिल्ह्य़ासाठी २६ हजार, तर नागपूर जिल्ह्य़ासाठी ४८.५३ लाख, असा एकूण २ कोटी २१ लाख रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.

Untitled-15

 

 ——————————————————————————————————————————– 

 

कोयना धरणात ४९ टीएमसी पाणीसाठा

वार्ताहर, कराड</p>

पावसाचा जोर ओसरल्याने खरिपाच्या पेरण्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. कोयना जलाशयाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून, सध्याचा पाणीसाठा ४९.१६ टीएमसी (४६.७१ टक्के) आहे. राजापूर येथे कृष्णा नदीचा विसर्ग १ लाख २३ हजार ६ क्युसेक आहे.

कोयना धरणक्षेत्रासह त्याखालील कृष्णा-कोयना नद्यांकाठी पावसाची उघडीप आहे.

कोयनेच्या पाणलोटात शनिवारी दिवसभरात नगण्य पर्जन्यवृष्टी असून, एकूण सरासरी २२२५.६६ मि.मी. (एकूण सरासरीच्या ४४.५१ टक्के) पावसाची नोंद झाली. वारणा धरणात २२.३४ टीएमसी (६५ टक्के), दूधगंगा ११.१५ (४४), राधानगरी ६.८८ (८२), धोम ५.७५ (४३), कण्हेर ५.४९ (५४.३२), उरमोडी ६.२८ (६३) तर धोम बलकवडी धरणात २.७५ टीएमसी (७४ टक्के) पाणीसाठा आहे.