अमरावती : आई मुलाला जन्म देते, हे सर्वश्रुत आहे; पण तिनेच स्वतःचे मूत्रपिंड १८ वर्षांच्या आपल्या तरुण मुलाला देऊन त्याला पुन्हा जीवन दिल्याची घटना येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयामध्ये (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) घडली. या रुग्णालयातील हे ५४ वे यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले.
बडनेरा येथील एका कुटुंबाची ही कहाणी. गौतम मुकेश प्रेमचंदानी हा १८ वर्षीय मुलगा मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू होते. उपचार सुरू असूनही प्रकृतीत फारसा फरक पडत नव्हता. अखेर त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्याला डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय दिला. प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत सर्वजण होते. मूत्रपिंडाची प्रतीक्षा सुरू असताना अरुणच्या आईने मूत्रपिंड दान करण्याची तयारी दर्शविली. महात्मा फुले जन आरोग्य अभियानाद्वारे मोफत मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. आईने संमती दिल्यानंतर त्यांच्या रक्तगटाची तपासणी करण्यात आली. रक्तगट जुळल्याने ती मूत्रपिंड देऊ शकत असल्याचे निष्पन्न झाले.
मुलाच्या पुढील भविष्याचा विचार करून आई रोशनी मुकेश प्रेमचंदानी (३८) यांनी आपली एक किडनी मुलगा गौतम प्रेमचंदानी याला देऊन त्याला नवीन जीवन दिले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे,डॉ. नयन चौधरी (काकडे), युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, डॉ.विशाल बाहेकर, बधिरिकरण तज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. शीतल सोळंके, डॉ. अश्विनी मडावी, डॉ.अंजू दामोदर, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ.माधव ढोपरे, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शीतल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ.सोनाली चौधरी, डॉ. पायल रोकडे ,डॉ. दिव्यांनी मुंदाने, त्याचप्रमाणे अधिसेविका चंदा खोडके, माला सुरपाम यांच्या सूचनेनुसार ज्योती तायडे, ज्योती काळे,लता मोहता, सरला राऊत, नीता कांडलकर, पूजा लांडे, दिपाली तायवाडे, अभिजीत निचत, वैष्णवी निकम, अक्षय पवार, मयुरी खेरडे, अनु वडे, योगिश्री पडोळे, रेखा विश्वकर्मा, वैशाली ढोबळे, जमुना मावसकर,वैभव भुरे, अभिजीत खंडारे, शितल वायझाडे, कुणाल कोरे,आहारतज्ञ, कविता देशमुख, रश्मिता दिघडे, आदींनी विषेश सहकार्य केले.