वर्धा : झाडू म्हणजे श्रमदानाचे प्रतीक! पण आता हा राजकीय प्रतीक आम आदमी पार्टीने केल्याने झाडूचा भाव वधारला. या पक्षाने २ ऑक्टोबरपासून विदर्भात झाडू यात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. ही पक्षाची राज्यात दुसरीच यात्रा असल्याचे राज्य संघटन सचिव भूषण ढाकुलकर यांनी सांगितले. या यात्रेद्वारे संवैधानिक हक्कांसाठी लढण्याचा संदेश दिला जाणार आहे. दिल्लीसारखी आधुनिक शैक्षणिक सुविधा, शेतमालाला भाव, तरुणांना रोजगार आदी प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.

हेही वाचा : सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची अडचण होणार; पश्चिम व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवाग्राम येथून ही यात्रा गांधी जयंती दिनी राज्य प्रभारी गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वात निघणार आहे. पक्षनेते अरविंद केजरीवाल हेच देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे महत्त्व यावेळी पटवून दिले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भोमले व शहराध्यक्ष मंगेश शेंडे यांनी नमूद करीत महाराष्ट्रात यापुढे आम आदमीचे सरकार येणार असल्याची खात्री दिली आहे. ही यात्रा विदर्भातील संपूर्ण अकरा जिल्ह्यांत फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले.