अकोला: साहित्य खरेदीच्या नावाने बँकेतून सुमारे २९ लाख रुपयांचे कर्ज काढल्यानंतर साहित्याची खरेदी न करता १३ जणांनी एचडीएफसी बँकेलाच गंडा घातला. या प्रकरणी कर्जाचा भरणा न केल्याने फसवणूक करणाऱ्या १३ कर्जदारांविरुद्ध रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली.

१३ जणांनी बँकेत खाते उघडल्यानंतर त्यांना बँकेद्वारे डेबिट कार्ड देण्यात आले. त्यांना मिळालेल्या ऑफरनुसार साहित्य खरेदी करण्याकरिता कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. साहित्य खरेदी केल्यानंतर त्याची रीतसर पावती बँकेत जमा करणे गरजेचे असताना या कर्जदारांनी दलालाच्या मदतीने साहित्य खरेदी न करता पैसे काढले. त्यामध्ये बँकेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करीत ‘एचडीएफसी’ बँकेचे नागपूर शाखेचे महाव्यवस्थापक पंकज ओरेकर यांच्या तक्रारीनुसार १३ जणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा… पश्चिम विदर्भात धरणसाठा ७३ टक्क्यांवर; गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्के कमी पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामदासपेठ पोलिसांनी तपास सुरू करून बाळापूर येथील सना कॉम्प्युटर, अकोला येथील मनकर्णा प्लॉटमधील रहिवाशी राज मो. उस्मान चौधरी, नायगाव परिसरातील शारीक उर्फ शाहरूख जिसबिल शाह या आरोपींना अटक केली.