नागपूर : तरुणीवर जीवापाड प्रेम केले, सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र, प्रेयसीच्या कुटुंबीयांनी केलेल्या विरोधामुळे लग्न होऊ शकले नाही. प्रेयसीचा साखरपुडा होत असल्याने प्रियकर नैराश्यात गेला. मग अर्ध्यावरती डाव मोडला अन् प्रियकराने तणावातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. राहुल सारखे (२४, रा. अमरनगर), असे मृताचे नाव आहे.

राहुल पूर्वी एका गोदामात हमालीचे काम करीत होता, मात्र गत काही दिवसांपासून बेरोजगार होता. आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर तो आजी आणि बहिणीसोबत रहात होता. परिसरातच राहणाऱ्या एका तरुणीशी राहुलचे प्रेमसंबंध होते. मात्र तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले. रविवारी प्रेयसीचा साखरपुडा झाला. यामुळे राहुल तणावात होता. रविवारी मध्यरात्री त्याने राहते घरी स्वयंपाकखोलीत छताच्या हुकला ओढणी बांधून गळफास लावला.

हेही वाचा – वायूप्रदूषणामुळे २०५० पर्यंत कर्करोग रुग्णांमध्ये ७७ टक्क्यांनी वाढ

हेही वाचा – “ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण…”, अमृता फडणवीसांनी घेतलेल्या उखाण्याची चर्चा; नागपुरातील कार्यक्रमात लावली हजेरी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास आजीची झोप उघडली असता तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांनी राहुलची बहीण मोनालीच्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.