बुलढाणा : मेहकर विधानसभा मतदारसंघांचे आमदार सिद्धार्थ खरात यांना एका कार्यक्रमात तलवार फिरविणे महागात पडले आहे.त्यांच्यावर चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारासह एका कार्यकर्त्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोटासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी (१४ मे) रात्री उशिरा सिद्धार्थ खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आमदार खरात यांच्यासह त्यांच्या हाती तलवार देणाऱ्या उकळी सुकळी ( ता. मेहकर, जि. बुलढाणा ) येथील अनिल यादवराव मोरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमडापूर पोलिसांनी कार्य तत्परता दाखवीत स्वतःहून ही कारवाई केली आहे.
ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा सार्वजनिक ठिकाणी तलवार फिरविल्याचा व्हिडीओ काल बुधवारी समाज माध्यमावर तुफान वेगाने सार्वत्रिक झाला होता. यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असताना पोलीस विभाग देखील ‘अलर्ट मोड’ वर आला. पोलिसांनी पारंपरिक आणि तांत्रिक तपास करत व्हिडिओचे घटना स्थळ, आमदार सोबतचे पदाधिकारी, आमदारांच्या हाती तलवार देणारा कार्यकर्ता यांचा तपास केला. त्यात ही घटना अमडापूर पोलीस ठाण्यातील ऐनखेड या गावातील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच एका लग्नाच्या वरातीमध्ये हा घटनाक्रम घडल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वतः पोलिसांनीच या प्रकरणाची फिर्याद दिली आहे. आता आमदार खरात यांनी फिरवलेली तलवार जप्त करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. या खळबळजनक घटनेचा तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.
मेहकर विधानसभा मतदारसंघांचे आमदार सिद्धार्थ खरात यांना एका कार्यक्रमात तलवार फिरविणे महागात पडले आहे.त्यांच्यावर चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://t.co/2jrmCKvB4K#viralvideo #socialmedia #MLA pic.twitter.com/LS9xA5fkRT
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) May 15, 2025
खरात यांनी एका लग्नाच्या वरातीत तलवार फिरवली होती. आर्म ऍक्ट नुसार सदरचा प्रकार गुन्हा आहे. खरात यांचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काल दिवसभर या घटनेची चर्चा रंगली. पडद्यामागेही अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका नंतर मेहकर आमदार सिद्धार्थ खरात पुन्हा चर्चेत आले आहे.शासकीय नोकरी सोडून राजकारणात उतरलेल्या सिद्धार्थ खरात पहिल्याच लढतीत संजय रायमूलकर यांना पराभूत केले होते.