चंद्रपूर : देशातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात एकही काम, आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, विदेशातील काळा पैसा परत आणू, अर्थव्यवस्था हे सर्व जैसे थे आहे. या सर्व आश्वासनांचे काय झाले यावर कुणी प्रश्र्न विचारू नये म्हणून अब की बार ४०० पार हा नवीन जुमला मोदींनी आणला आहे. या जुमल्याचेच मोदी गॅरंटी असे नामकरण केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकीकडे मोदींची नफरत व विभाजनाची भाषा आहे तर दुसरीकडे महात्मा गांधी यांची प्रेमाची भाषा आहे. या लढाईत देशातील १४० कोटी जनता गांधींच्या प्रेमाच्या भाषेला विजयी करेल असे मत काँग्रेसचे कन्हैयाकुमार यांनी व्यक्त केले.

येथील न्यु इंग्लिश स्कूल हायस्कूलचे क्रीडांगणावर इंडिया व महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. मंचावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर, एन. एस. यू.आय. अध्यक्ष आमिर शेख उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कन्हैयाकुमार यांनी मोदी सरकारवर टिका केली. मी महाराष्ट्रात लढण्याची हिम्मत घेण्यासाठी नियमित येत असतो. हा लढणाऱ्यांचा प्रदेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर या रडून नाही तर विरोधकांशी लढून जिंकणार आहे.

हेही वाचा : मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना अनेक आश्वासने दिली होती. वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. अशी असंख्य आश्वासने मोदी यांनी दिली. मात्र त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. शेतकऱ्यांना एमएसपी मिळाला नाही. मतदारांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकही गोष्ट पूर्ण झाली नाही. पंतप्रधानांकडे बोलण्यासाठी आता काहीच उरले नाही. त्यामुळेच अब की बार ४०० पारचा नारा देवून मतदारांना भ्रमीत केले जात आहे. ज्या व्यक्तीने जीवनसाथी सोबत धोका केला तोच व्यक्ती अशा प्रकारे खोटं बोलू शकतो असेही कन्हैयाकुमार म्हणाले. एक अकेला सबको भारी असे म्हणायचे. महाराष्ट्रात मोदींनी उध्दव ठाकरे यांची शिवसेना तोडली व एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अजित पवार यांना सोबत घेतले. काँग्रेसचे निवडणूक हरणारे नेते अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना सोबत घेतले. आता त्यांनी राज ठाकरे यांना महायुतीत आणले आहे.

हेही वाचा : ‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’

केवळ निवडणूक हरण्याच्या भीतीनेच त्यांनी या सर्वांना सोबत घेतले आहे असेही कन्हैयाकुमार म्हणाले. असे असले तरी चंद्रपूरचे मतदार २०१९ मध्ये मोदींच्या बहकाव्यात आले नाही, २०२४ मध्ये देखील येणार नाही असेही ते म्हणाले. महायुतीच्या स्थानिक उमेदवाराने देशाच्या संस्कृती व इतिहासाचा अपमान केला आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंकित केले. महिलांचा अपमान चंद्रपुरातील जनता सहन करणार नाही असेही ते म्हणाले. मोदी यांना भविष्य चांगल्या प्रकारे माहित असावे म्हणून ते मतदानापूर्वीच अब की बार ४०० पार असा नारा देत आहेत. त्यांनी पेट्रोल, गॅस, बेरोजगारी, महागाई आणखी किती पार होणार हे देखील सांगून टाकावे. प्रचाराच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यात अब की बार ४०० पार ही गोष्ट पद्धतशीर पेरली जात आहे. मतदारांनी यापासून सावध रहावे असेही कन्हैयाकुमार म्हणाले. राजकारण भावना भडकावून नाही तर लोकांच्या मुद्यांवर केले पाहिजे. मात्र मोदी व भाजप भावना भडकावून राजकारण करीत आहे. इंडिया व महाविकास आघाडीत अनेक पक्ष आहेत. तेव्हा मतभेद विसरून महाराष्ट्राच्या आत्मसन्मानासाठी एकजूट व्हा. जुमलेबाजी करून मोदी जिंकणार नाही. देशातील १४० करोड जनता मोदी यांना धडा शिकविणार असेही कन्हैयाकुमार म्हणाले. याप्रसंगी आघाडीच्या उमेदवार आमदार धानोरकर यांनी देशाचे संविधान व लोकशाही टिकविण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी केले. संचालन मनीष तिवारी यांनी केले.

हेही वाचा : काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस ‘वेटींग सीएम’

भारतीय जनता पक्षात पाहिले लालकृष्ण अडवानी वेटींग पीएम होते. तसे त्यांना म्हटले देखील जायचे. आता भाजप मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेटींग सीएम आहेत.