नागपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी विविध संघटनेचे पदाधिकारी नागपुरातील लोहापूल जवळच्या स्मारकाजवळ आदरांजली वाहण्यासाठी आले. परंतु, येथे काही भागात अस्वच्छतेसोबत रिकाम्या मद्याच्या बाटल्या बघून उपस्थितांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.

उपराजधानीत अनेक थोर महापुरुषांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांची देखभाल-दुरुस्तीसह परिसरात स्वच्छता राखण्यासाठी नागपूर महापालिका वा संबंधित शासकीय यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षित आहे. परंतु, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मंगळवारी जयंती असतानाही येथे अस्वच्छता बघून आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या ऑल इंडिया फारवर्ड ब्लॉक आणि इतरही राजकीय पक्षासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. त्यापैकी काहींनी समाज माध्यमांवर हे छायाचित्र प्रसारित केले. या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची मागणीही याप्रसंगी राष्ट्रीय फारवर्ड ब्लॉकचे राष्ट्रीय संयोजक आणि ट्रेड युनिनय को ऑर्डिनेशन सेंटरचे (टीयूसीसी) राष्ट्रीय सचिव संजय कटमवार यांनी केली.

हेही वाचा…वर्धा : मराठा सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार; म्हणतात, “आमचे काम नव्हे,” प्रशासन पेचात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहण्यासाठी आलेल्यांमध्ये वैभव गारसे, अन्ना बरगट, संतोष मिश्रा, कमलदीप सिंह कोचर, सुधाकर धुर्वे, अजय कुमार यादव, तन्ना नागपुरी, सर्जेराव गरपट आणि इतरही विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.